लम्पी नियंत्रणासाठी पशुधनाचे लसीकरण अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लम्पी नियंत्रणासाठी पशुधनाचे लसीकरण अभियान
लम्पी नियंत्रणासाठी पशुधनाचे लसीकरण अभियान

लम्पी नियंत्रणासाठी पशुधनाचे लसीकरण अभियान

sakal_logo
By

rat४p८.jpg
५४४७५
मंडणगडः तालुक्यात लम्पी रोगाचे प्रतिबंधक डोस देताना डॉ. पूजा शिंदे व कर्मचारी.

मंडणगडात १२ हजार ७८९ पशुधन, ७ हजार डोस प्राप्त
लम्पी नियंत्रण ; पशुधनाचे लसीकरण अभियानास मर्यादा
मंडणगड तालुका; ;
मंडणगड, ता. ४ ः गाई व बैलामध्ये पसरलेल्या लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय विभागाने तालुक्यात लसीकरण मोहीम हातात घेतील आहे. मंडणगडात १२ हजार ७८९ पशुधन असून ७ हजार डोस प्राप्त झाल्याने पशुधनाचे लसीकरण अभियानास मर्यादा येत आहेत.कर्मचाऱ्यांची १३ पदे रिक्त आहेत ही आणखी एक मर्यादा आहे. या मोहिमेअंर्तगत तालुक्यात लम्पी रोगाचा प्रतिबंध करणाऱ्या लसीचे ७ हजार डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ४ ऑक्टोबर अखेर ३३६५ डोसचे तालुक्यात लसीकरण केले आहे. तालुक्यात एकूण १६ हजार ५२२ इतके पशुधन असून त्यापैकी गाई व बैलांची संख्या १२ हजार ७८९ इतकी आहे. तालुक्यात जिल्हा परिषद व राज्य शासनाचे एकूण ९ पशू दवाखाने आहेत. यात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची १३ पदे रिक्त असल्याने मोहीम राबवताना कार्यरत कर्मचाऱ्यांवर जास्तीचा कामाचा ताण पडला आहे. सुदैवाने तालुक्यातील पशुधनात अद्याप लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही. तालुक्यातील दवाखाने व कर्मचारी यांचे गणित लक्षात घेता एकूण २२ पदे कार्यरत असताना कर्मचाऱ्यांची १३ पदे रिक्त असल्याची माहिती पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा शिंदे यांच्याकडून प्राप्त झाली आहे.