मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा दरबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा दरबार
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा दरबार

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा दरबार

sakal_logo
By

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा दरबार
चिपळुणात जोरदार तयारी; लढ्यांचा घेणार आढावा
चिपळूण, ता. ४ ः मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा क्रांतीच्या सहाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित मराठा दरबार कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून चिपळूण तालुक्यातील सुमारे २ हजारावर समाजबांधव उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत आहे.
मराठा समाजाच्या परंपरांप्रमाणे मराठा दरबार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विविध लढा संदर्भातला आढावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर या वेळी समाजातील उत्कृष्ट व अतुलनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कामाचा दबदबा निर्माण करणारे व चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुभाषराव चव्हाण यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तसेच जवळपास ५० पुस्तके लिहिणाऱ्या व साहित्यक्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारे बँकेचे चेअरमन व साहित्यिक तानाजीराव चोरगे यांचा साहित्यभूषण पुरस्काराने सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय मराठा समाजाच्या उन्नती आणि विकासासाठी ५० वर्षाहून अधिक काळ समर्पण भावनेने काम करणाऱ्या व खेडमध्ये मराठा भवन उभारणारे ज्येष्ठ मराठा नेते केशवराव भोसले यांचाही समाजभूषण या पुरस्काराने तसेच नीलेश चव्हाण यांचा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
या महत्वाच्या पुरस्कार व सन्मानाबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी बजावलेल्या मराठा व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अतुलनीय कामगिरी बजावली आहे व त्याची दखल सामाजिक क्षेत्रामध्ये घेतली गेली आहे अशा व्यक्तींनी अथवा त्यांच्यावतीने कोणीही आणि मराठा क्रांती मोर्चाच्या चिपळूण कार्यालयाशी १२ ऑक्टोबरपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.