सावंतवाडीतून शिवसैनिक मुंबईकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीतून शिवसैनिक मुंबईकडे
सावंतवाडीतून शिवसैनिक मुंबईकडे

सावंतवाडीतून शिवसैनिक मुंबईकडे

sakal_logo
By

54502
सावंतवाडी ः येथील रेल्वे स्टेशनवर घोषणाबाजी करत दसरा मेळाव्याला निघालेले शिवसैनिक.


सावंतवाडीतून शिवसैनिक मुंबईकडे

ठाकरेंचा दसरा मेळावा; रेल्वेस्थानकावर घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवतीर्थ व बीकेसी मैदानावर शिंदे गट व उद्धव ठाकरे या दोन गटाचा दसरा मेळावा होत आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातून ठाकरे गटाचे शेकडो शिवसैनिक मुंबईसाठी रवाना झालेत. तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या उपस्थितीत आज सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर उपस्थितीत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी राऊळ म्हणाले, ‘‘दसरा मेळावा हा एकच जो शिवाजी पार्कवर होतो. आज शेकडो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघाले आहेत. या ठिकाणी शिवाजी पार्कवर ठाकरेंची तोफ शिवतीर्थावर धडकणार असून विचारांचे सोनं इथे लुटले जाणार आहे. आमच्यासोबत जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. जनशताब्दी, कोकणकन्या, तुतार एक्स्प्रेस अशा तीन रेल्वेतून ३०० हून अधिक शिवसैनिक सावंतवाडी तालुक्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.’’ दरम्यान, शिंदे गटाच्या मेळाव्यासाठीही कार्यकर्ते जमवले जात आहेत. त्यांच्या मेळाव्या मागचा कर्ता करवीता वेगळा आहे, असे मत राऊळ यांनी व्यक्त केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शिवदत्त घोगळे, आबा सावंत, दिनेश सावंत, संदीप गवस, संदीप माळकर, राजू शेटकर, तुकाराम कासार, उल्हास परब, विष्णू परब आदींसह शेकडो शिवसैनिक मळगाव रेल्वेस्थानकावर उपस्थित होते.