उपवनसंरक्षकपदी रेड्डी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपवनसंरक्षकपदी रेड्डी
उपवनसंरक्षकपदी रेड्डी

उपवनसंरक्षकपदी रेड्डी

sakal_logo
By

सकाळ इम्पॅक्ट लोगो
---

54531
सावंतवाडी ः उपवनसंरक्षक पदाचा कार्यभार एस.नवकिशोर रेड्डी यांनी स्वीकारल्यानंतर स्वागत करताना चिपळूणचे उपवनसंरक्षक दीपक खाडे (छायाचित्र ः रुपेश हिराप )

उपवनसंरक्षकपदी रेड्डी
सावंतवाडी, ता. ४ ः चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या जिल्ह्याच्या उपवनसंरक्षकपदाचा कार्यभार अखेर एस. नवकिशोर रेड्डी यांनी स्वीकारला. यावेळी जिल्ह्यातील वनक्षेत्रपाल उपस्थित होते. अलिकडेच ‘सकाळ’ने वनविभागाच्या रिक्त पदावर प्रकाशक्षोत टाकत वस्तुस्थिती मांडली होती.
सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक शहाजी नारनवर हे ३१ मे रोजी निवृत्त झाले होते. तेव्हापासून या पदाचा कार्यभार हा चिपळूण उपवनसंरक्षक दीपक खाडे यांच्याकडे होता. ते आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून जिल्ह्यात काम पाहात होते. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच शासनाने वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात रेड्डी यांची बदली उपवनसंरक्षकपदी केली असून ते यापूर्वी अमरावती-मेळघाट येथे आकोट विभागाच्या उपवनसंरक्षक पदावर होते. तेथे त्यांनी वन्यजीव मोहिमेत चांगले काम केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही इकोटुरिझमसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदभार स्विकारताच त्यांनी कार्यालयीन कामाचा आढावाही घेतला. प्रभारी उपवनसंरक्षक खाडे यांनी कामकाजाची माहिती दिली. अलिकडेच ‘सकाळ’ने वनविभागाच्या रिक्त पदावर प्रकाशक्षोत टाकत वस्तुस्थिती मांडली होती. मुख्य वनसंरक्षक मनिकानंद रामारुजुम यांनी आठवड्याभरात या पदावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार अखेर जिल्ह्याच्या उपवनसंरक्षकपदी रेड्डी यांची नियुक्ती झाली आहे.