विद्याप्रसारक मंडळाच्या माध्यमातून सेवा पंधरवडा समारोह संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्याप्रसारक मंडळाच्या माध्यमातून सेवा पंधरवडा समारोह संपन्न
विद्याप्रसारक मंडळाच्या माध्यमातून सेवा पंधरवडा समारोह संपन्न

विद्याप्रसारक मंडळाच्या माध्यमातून सेवा पंधरवडा समारोह संपन्न

sakal_logo
By

rat४p४.jpg
५४४७१
कोळंबेः ''राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा'' कार्यक्रमाचा समाप्ती समारोहासाठी आलेल्या जठार यांचे स्वागत करण्यात आले.


गरिबीला कमजोरी न समजता त्यावर मात करा
प्रमोद जठार यांचे प्रतिपादन ; वसतिगृहास १ लाखाची मदत, १० संगणक देणार

संगमेश्वर, ता. ४ ः गरिबीला आपली कमजोरी समजण्यापेक्षा त्यावर मात करून पुढे जाण्यासाठी सतत प्रयत्न करा व त्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करा, असे प्रतिपादन भाजपचे नेते माजी आमदार तसेच भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यानी केले.
तालुक्यातील कोळंबे विद्या प्रसारक मंडळाच्या गुरूकूल वसतिगृह सभागृहात रविवारी (ता. २) ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या ''राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा'' कार्यक्रमाचा समाप्ती समारोह पार पडला.त्याप्रसंगी ते बोलत होते. जठार यांचे त्याआधी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत विद्यार्थ्यांनी स्वागत केले.प्रमोद जठार यांनी शाळेत नव्याने सुरू झालेल्या वसतिगृहास तत्काळ १ लाख रुपयांची मदत देऊ केली तर १० संगणक संच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय भाषणातून वाचनाचे महत्व विषद केले.
ग्रंथप्रदर्शन व त्यानंतर मोदींच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे संयोजक अनिल घोसाळकर यांनी प्रमोद जठार यांना राममंदिराची प्रतिमा भेट दिली. अतिथींची ओळख व सूत्रसंचालन प्रा. सानिका मुळ्ये यांनी केले. ईशस्तवन, स्वागतपद्य व स्वागताची औपचारिकता पार पडल्यावर योगेश मुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शालेय विद्यार्थ्यांची भाषणे व कविता वाचन झाले. शाळेतील सहशिक्षक शिंदे यांनी शिक्षकांचे मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष नयनभाऊ मुळ्ये यांनी मनोगतातून आपण सर्वच मोदी सरकारच्या योजनांचे लाभार्थी आहोत याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.
देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून मोदीजींचे कार्य विषद केले.शाळेचे मुख्याध्यापक संजय मुळ्ये यांनी आभारप्रदर्शन केले तर प्रा. संदीप मुळ्ये यांनी संपूर्ण वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाचा समारोप केला.