परीक्षेत खोटी ओळखपत्रे; दोघा संशयितांची मुक्तता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षेत खोटी ओळखपत्रे; 
दोघा संशयितांची मुक्तता
परीक्षेत खोटी ओळखपत्रे; दोघा संशयितांची मुक्तता

परीक्षेत खोटी ओळखपत्रे; दोघा संशयितांची मुक्तता

sakal_logo
By

परीक्षेत खोटी ओळखपत्रे;
दोघा संशयितांची मुक्तता
ओरोस, ता. ४ ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर सहाय्यक पदासाठी कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये घेतलेल्या परीक्षेसाठी खोटी ओळखपत्र सादर करीत डमी नावाने परीक्षा केंद्रात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या दोन संशयितांची सबळ पुराव्याअभावी मुख्य न्याय दंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी निर्दोष मुक्तता केली. संशयितांतर्फे ॲड. अमोल सामंत, संग्राम देसाई, अशपाक शेख यांनी काम पाहिले.
पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, २८ ऑगस्ट २०१६ ला कुडाळ हायस्कूल परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला होता. याबाबत तत्कालीन कुडाळ नायब तहसीलदार नंदकुमार तारी (वय ५४) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कर सहाय्यक ही परीक्षा २८ ऑगस्ट २०१६ ला जाहीर झाली होती. यासाठी कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज हे परीक्षा केंद्र होते. या केंद्रावर परमेश्वर उद्धव आंधळे (वय २८, रा. जिरेवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) हे मुख्य परीक्षार्थी होते; मात्र ते स्वतः परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित न राहता भगवान भगवंत चेमटे (रा. शेगाव शिंगोरी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) यांना परमेश्वर उत्तम अंधारे या बनावट नावाने ओळखपत्र तयार करून परीक्षा केंद्रावर पाठविले होते. ओळखपत्राची तपासणी करताना ही बाब उघड झाली होती.