स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देवगडची का पिछेहाट? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये
देवगडची का पिछेहाट?
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देवगडची का पिछेहाट?

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देवगडची का पिछेहाट?

sakal_logo
By

‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये
देवगडची का पीछेहाट?

भाजपची टीका; सत्ताधाऱ्यांनी बोध घ्यावा

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ ः यंदाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये येथील देवगड-जामसंडे नगरपंचायतीची अत्यंत दयनीय अवस्थेसह पीछेहाट झाली आहे. नगरपंचायतीचा विभागीय गुणानुक्रमांकामध्ये २९५ पैकी २१८ वा, तर राज्य क्रमांकामधील ९० पैकी ८५ वा क्रमांक आला आहे. यातून नगरपंचायतीच्या स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असल्याची टीका भाजपचे नगरसेवक गटनेते शरद ठुकरूल यांनी केली आहे. यातून सत्ताधारी आतातरी बोध घेणार का, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये येथील नगरपंचायतीची घसरण झाल्याबद्दल भाजपच्या विरोधी नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच फटकारले. याबाबत ठुकरूल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मगील पाच वर्षे देवगड जामसंडे नगरपंचायत स्वच्छतेच्या बाबतीत सातत्याने अग्रेसर राहिली होती. नवीन नगरपंचायत असतानाही विभागीय, तसेच राज्य गुणानुक्रमामध्ये अव्वल नंबर मिळविले होते. जिल्हास्तरावर नगरपंचायत विभागात नेहमी अग्रेसर राहिली होती. असे असतानाही मागील सत्ताधारी व प्रशासनाने मागील पाच वर्षांत देवगड जामसंडे शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सातत्याने जे प्रयत्न केलेले होते, त्यामध्ये आताचे सत्ताधारी व प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण - २०२२’चा आलेला निकाल सत्ताधाऱ्‍यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. या निकालावरून देवगड जामसंडेच्या जनतेने स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता गांभीर्याने काम करणे गरजेचे आहे, असा सल्लाही ठुकरूल यांनी दिला.