फोटोग्राफी स्पर्धेत सिद्धेश भाताडे प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोग्राफी स्पर्धेत सिद्धेश भाताडे प्रथम
फोटोग्राफी स्पर्धेत सिद्धेश भाताडे प्रथम

फोटोग्राफी स्पर्धेत सिद्धेश भाताडे प्रथम

sakal_logo
By

फोटोग्राफी स्पर्धेत
सिद्धेश भाताडे प्रथम
रत्नागिरी : येथील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात निसर्ग मंडळ विभागातर्फे जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त आयोजित फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम सिद्धेश भाताडे (द्वितीय वर्ष वाणिज्य), द्वितीय क्रमांक निनाद सुर्वे (प्रथम वर्ष वाणिज्य) आणि तृतीय क्रमांक मयुरेश आगरे (द्वितीय वर्ष वाणिज्य) याने मिळवला. उत्तेजनार्थ बक्षीस ऋषिकेश चव्हाण (तृतीय वर्ष कला) याला देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण सांस्कृतिक विभागप्रमुख वैभव कीर यांनी केले. निसर्ग, वारसा, धार्मिक आणि ग्रामीण पर्यटन असे पर्यटनाचे प्रकार आहेत. आजकाल पर्यटनस्थळांचे फोटो आपण सोशल मीडियावर पाहतो, सोशल मिडियाच्या माध्यमातून पर्यटनाच्या स्थळांची माहिती मिळते त्याचबरोबर चांगली जाहिरात पर्यटन स्थळांची होते. या हेतूने फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली होती. या वेळी प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, निसर्ग मंडळ विभागप्रमुख ऋतुजा भोवड, प्रा. राखी साळगांवकर उपस्थित होते.