देवरूख ः अभियान राबवून पर्यावरणाचा ऱ्हास रोखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख ः अभियान राबवून पर्यावरणाचा ऱ्हास रोखा
देवरूख ः अभियान राबवून पर्यावरणाचा ऱ्हास रोखा

देवरूख ः अभियान राबवून पर्यावरणाचा ऱ्हास रोखा

sakal_logo
By

rat4p16.jpg - KOP22L54506 देवरूख ः केशवसृष्टी भागात मान्यवरांच्या हजेरीत वृक्षारोपण करण्यात आले.

झाडे लावून पर्यावरण ऱ्हास रोखा
तहसीलदार थोरात ; देवरूखात अभियानाची सांगता
देवरूख, ता. ६ ः वृक्षतोडीमुळे व वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे पर्यावरणात होत असलेल्या असमोतलाने जनसामान्यांना विविध समस्या व आजारांना सामोरे जावे लागत आहे. यासाठीच शासन वृक्षलागवडीच्या अनेक योजना राबवत आहे. या योजनेत नुसती वृक्ष लागवड करून नंतर दुर्लक्ष न करता ती झाडे संगोपन करून वाढवली पाहिजेत. ती सरकारची जबाबदारी आहे असे न समजता ती आपली जबाबदारी आहे, असे समजून नियोजनबद्ध पद्धतीने जोपासली तरच पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल. त्याकरिता नागरिकांना झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला पाहिजे, असे प्रतिपादन तहसीलदार सुहास थोरात यांनी केले. सेवा पंधरवडा कार्यक्रम राबवण्यात आला. त्याचा भाग म्हणून भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुक्याच्यावतीने देवरूखातील केशवसृष्टी भागात सांगता सोहळा आयोजित करून वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला होता. या वेळी तहसीलदार बोलत होते. नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, चेतन विसपुते, मुकुंद जोशी, अभिजित शेट्ये, नगरसेवक सुशांत मुळ्ये, ज्येष्ठ नागरिकांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी केशवसृष्टी भागात विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्या वृक्षाचे संवर्धन केशवसृष्टीतील नागरिक व नगरपंचायत यांच्या सहकार्याने होईल, अशी ग्वाही नगरपंचायतीच्यावतीने नगराध्यक्षा शेट्ये यांनी दिली.