कामथेतील मानसी महाडीकने मारले कुस्तीचे मैदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामथेतील मानसी महाडीकने मारले कुस्तीचे मैदान
कामथेतील मानसी महाडीकने मारले कुस्तीचे मैदान

कामथेतील मानसी महाडीकने मारले कुस्तीचे मैदान

sakal_logo
By

ratchl४१.jpg
५४४८९
मानसी महाडीक

मानसी महाडीकने
मारले कुस्तीचे मैदान
कामथेची कन्या ; आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत जिल्ह्याला रौप्य
चिपळूण, ता. ४ ः पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्ती खेळात महिलांचा सहभाग तसा नगण्यच. अशा खेळात कामथे येथील मानसी महाडीक या विद्यार्थिनीने विभागीय कुस्ती स्पर्धेचे मैदान मारत कामगिरीची चुणूक दाखवली. अंतिम फेरीपर्यंत जोरदार मुसंडी मारत तिने जिल्ह्याला मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कुस्तीतील पहिले रौप्यपदक मिळवून दिले. यामुळे कुस्तीगीरांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत असून मानसीवर अभिनंदनाचा वर्षाव आहे.
खोपोली येथे १ ते २ ऑक्टोबरला झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत मानसी महाडिक (कामथे-चिपळूण) हिने ५३ किलो खालील वजनी गटामध्ये यशस्वी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये मानसीने अंतिम फेरीपर्यंत जोरदार मजल मारत रौप्य पदकाची कमाई केली. मानसी आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळवणारी जिल्ह्यातील पहिली महिला कुस्ती खेळाडू आहे. ती चिपळुणातील डीबीजे महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत आहे. पुढील विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी मानसीची निवड झाली आहे.
मानसी सामान्य कुटुंबात जन्माला आली असून, ती अत्यंत मेहनती खेळाडू असल्याचे प्रशिक्षकांकडून सांगण्यात आले. प्रशिक्षक वैभव चव्हाण यांच्याकडून ती कुस्तीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे. तिच्या या यशाबद्दल डीबीजे कॉलेज, रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले. मानसीच्या यशामुळे भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यासह महिला कुस्तीगीरांची संख्या नक्कीच वाढेल, असा आशावाद असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.