वाघोटनचे ‘नवशा मारुती’ ढोल वादनात प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघोटनचे ‘नवशा मारुती’ ढोल वादनात प्रथम
वाघोटनचे ‘नवशा मारुती’ ढोल वादनात प्रथम

वाघोटनचे ‘नवशा मारुती’ ढोल वादनात प्रथम

sakal_logo
By

54576
कासार्डे ः विजेत्या नवशा मारुती ढोल पथकास गौरविताना मान्यवर. (छायाचित्र : एन. पावसकर)

वाघोटनचे ‘नवशा मारुती’ ढोल वादनात प्रथम

कासार्डेतील स्पर्धा; सिद्धीविनायक मंडळाचा पुढाकार

तळेरे, ता. ४ : कासार्डे येथील श्री सिद्धीविनायक नवरात्रोत्सव मंडळातर्फे कासार्डे तिठा येथे ढोलवादन स्पर्धा उत्साहात झाली. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवशा मारुती ढोल पथक वाघोटन यांनी प्रथम, पवार मंडळ पथक दिवटेवाडी -राजापूर (जि. रत्नागिरी) यांनी व्दितीय, तर धूतपापेश्वर नाडणकरवाडी पवार मंडळ राजापूर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
वैभववाडीचे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब व कासार्डे माजी सरपंच संतोष पारकर यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी मंडळाचे सल्लागार संतोष कानडे, कासार्डे सोसायटी चेअरमन श्रीपत पाताडे, मंडळाचे अध्यक्ष आण्णा खाडये, उपाध्यक्ष अभिजित शेटये, रुपेश मुणगेकर, राकेश मुणगेकर, संदीप केसरकर, परीक्षक नितीन करंदीकर, मिलिंद देसाई, राजू शेटये, वैभव माळवदे, रमेश मुणगेकर आदी उपस्थित होते. सहभागी ढोल पथकांनी उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकत परिसर दणाणून सोडला. यावेळी ढोल पथकांनी केलेली पारंपरिक वेशभूषा, वादनाच्या चाली लक्षवेधी ठरल्या. प्रथम तीन क्रमांकासह उत्कृष्ट ताशा वादक-जांभाई हनुमान वाद्य मंडळ पोंभुर्ले, झांज वादक-गांगोदेव ढोलपथक आंगले-सौंदळकरवाडी यांना सल्लागार व संस्था अध्यक्ष नितीन उर्फ पप्या लाड, तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार पाताडे, माजी उपसभापती प्रकाश पारकर, जाकीर शेख, विद्याधर नकाशे आदींच्या हस्ते गौरविण्यात आले. सहभागी पथकांना सन्माचिन्ह देण्यात आले. स्पर्धा माजी सरपंच संतोष पारकर व संतोष पारकर मित्रमंडळाने पुरस्कृत केली होती. अमोल जमदाडे यांनी आभार मानले.