मुख्याधिकारी जिरगे यांचा मालवण रोटरीतर्फे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्याधिकारी जिरगे यांचा
मालवण रोटरीतर्फे सत्कार
मुख्याधिकारी जिरगे यांचा मालवण रोटरीतर्फे सत्कार

मुख्याधिकारी जिरगे यांचा मालवण रोटरीतर्फे सत्कार

sakal_logo
By

54579
मालवण ः मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचा सत्कार करताना रोटरीचे पदाधिकारी.

मुख्याधिकारी जिरगे यांचा
मालवण रोटरीतर्फे सत्कार
मालवण, ता. ४ : केंद्रातर्फे आयोजित स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत येथील पालिकेचा विशेष पुरस्कार देऊन देशपातळीवर सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांना दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर येथील रोटरी क्लबतर्फे मुख्याधिकारी जिरगेंचा विशेष सत्कार करण्यात आला.
येथील पालिकेचे शहर समन्वयक निखिल नाईक, बांधकाम पर्यवेक्षक सुधाकर पाटकर, लिपिक महेश परब, पाणीपुरवठा अभियंता राजा केरीपाळे यांनाही चांगल्या सेवेबाबत रोटरीच्यावतीने सन्मानित करण्यात आले. पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचेही रोटरी सदस्यांनी कौतुक केले. रोटरीचे अध्यक्ष रतन पांगे यांनी यांनी मुख्याधिकारी जिरगे यांना सन्मानित केले. यावेळी सेक्रेटरी अभय कदम, खजिनदार रमाकांत वाक्कर, माजी अध्यक्ष उमेश सांगोडकर, डॉ. अजित लिमये, डॉ. लीना लिमये, बाळू तारी, भाऊ साळगावकर, अनिल चव्हाण, चाचा हडकर, अजय जोशी, ऋषिकेश पेणकर, संदेश पवार, रंजन तांबे आदी उपस्थित होते.