शासकीय मेडिकल कॉलेज कारभाराची चौकशी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय मेडिकल कॉलेज
कारभाराची चौकशी करा
शासकीय मेडिकल कॉलेज कारभाराची चौकशी करा

शासकीय मेडिकल कॉलेज कारभाराची चौकशी करा

sakal_logo
By

54504
परशुराम उपरकर

शासकीय मेडिकल कॉलेज
कारभाराची चौकशी करा
परशुराम उपरकर; सचिवांकडे तक्रार
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये अडीच कोटींच्या फर्निचर खरेदीचा घोटाळा झाला आहे. त्‍यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हायला हवी. त्‍याबाबत राज्‍याचे उच्च व तंत्र शिक्षणाचे मुख्य व प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार केली असल्‍याची माहिती मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
श्री.उपरकर म्‍हणाले, ‘‘अडीच कोटींच्या फर्निचर खरेदीतील भ्रष्टाचाराचा रात्रीत चाललेला खेळ मनसेने उघड केला होता. त्‍यानंतर मेडिकल कॉलेजचे डीन यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले. आपण स्वच्छ प्रतिमेचे असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला; मात्र रात्री अडीचपर्यंत मेडिकल कॉलेज कार्यालयात बसून संबंधित ठेकेदार आणि क्लार्क या अडीच कोटींच्या खरेदीची फाईल बनवत होते. मनसेने हे उजेडात आणल्यानंतर प्रशासन अधिकारी नवले व कार्यालय अधीक्षक यांनी पोलिसांत तक्रार दिली.’’