पान एक-फोंडाघाटमध्ये सिमेंट भरलेला ट्रक उलटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-फोंडाघाटमध्ये सिमेंट भरलेला ट्रक उलटला
पान एक-फोंडाघाटमध्ये सिमेंट भरलेला ट्रक उलटला

पान एक-फोंडाघाटमध्ये सिमेंट भरलेला ट्रक उलटला

sakal_logo
By

टीपः swt4.jpg मध्ये फोटो आहे.
54513
फोंडाघाट : येथील रस्त्यालगत सिमेंट पोती भरलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला.
.....

फोंड्यात सिमेंट भरलेला ट्रक उलटला

चालक गंभीर ः व्हील एक्‍सल तुटल्‍याने अपघात
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ४ ः तालुक्‍यातील फोंडाघाट येथील पिंपळवाडीदरम्‍यान सिमेंट पोती भरलेला ट्रक उलटून अपघात झाला. खड्डेमय रस्त्यामुळे ट्रकचे पुढील व्हील एक्‍सल तुटले आणि ट्रक रस्त्यालगतच्या शेतामध्ये पलटी झाला. यात ट्रकचालकाला गंभीर दुखापत झाली‍ आहे.
कोल्‍हापूर येथून फोंडाघाट कणकवलीमार्गे गोवा अशी सिमेंट वाहतूक करणारा ट्रक (एमएच ११ अेएल ५०२०) हा फोंडाघाट सोडल्‍यानंतर पिंपळवाडी येथे आला असता ट्रकचा पुढील व्हील एक्‍सल तुटला. त्‍यामुळे रस्त्यालगतच्या शेतात ट्रक पलटी झाला. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ट्रक पलटी झाल्यावर सिमेंटची पोती लगतच्या शेतात विखुरली. तसेच डिझेलची टाकी फुटल्‍याने डिझेल वाहून गेले. या अपघातात ट्रक चालकाच्या डोक्याला जखमा झाल्या. त्‍याला उपचारासाठी पोलिसांनी रिक्षातून फोंडाघाट प्राथमिक आरोग्‍य केंद्रात पाठवले होते. मात्र, दुपारपर्यंत ट्रकचालक प्राथमिक आरोग्‍य केंद्राऐवजी अन्यत्र गेल्‍याने त्‍याचा ठावठिकाणा लागला नव्हता.
कणकवली फोंडाघाट मार्गावर आयटीआय ते साईमंदिर आणि चेकपोस्ट ते घाट रस्त्यावर पिंपळवाडी येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. यात वाहनचालकाला कसरत करत वाहने चालवावी लागतात.