कणकवली : मारहाण वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : मारहाण वृत्त
कणकवली : मारहाण वृत्त

कणकवली : मारहाण वृत्त

sakal_logo
By

फोटो :kan46.jpg
54572 कणकवली : शहरातील बसस्थानक परिसरात परप्रांतीय कामगारांत हाणामारी झाली.
.....

कणकवलीत परप्रांतीय
कामगारांत हाणामारी

कणकवली, ता. ४ : शहरातील बसस्थानकासमोर नवरात्र उत्‍सवात सांस्कृतिक कार्यक्रम पाहत असताना दोघा परप्रांतीय कामगारांत शाब्दिक बाचाबाची झाली. त्‍यानंतर महामार्गावर येऊन हे दोघे कामगार पुन्हा एकमेकांसमोर भिडले. यात एकाने दुसऱ्या कामगाराच्या डोक्‍यावर दांडा मारल्याने तो जखमी झाला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
शहरातील बसस्थानकासमोरील महामार्गावर विजापूर (कर्नाटक) येथील दोघे कामगार एकमेकांना भिडल्‍यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या हाणामारीत एका कामगाराच्या हाताला दांडा लागला. या दांड्याने त्‍याने दुसऱ्या कामगारावर हल्‍ला केला. यात दांड्याचा प्रहार डोक्‍यावर बसला. डोक्‍यातून रक्‍तही येऊ लागल‍यानंतर इतर कामगारांनी हस्तक्षेप करून हाणामारी थांबवली. यानंतर ज्‍या कामगाराने मारहाण केली तो कणकवली पोलिस ठाण्यात हजर झाला. काही वेळाने मार बसलेला कामगारही पोलिस ठाण्यात हजर झाला. मात्र, तो जखमी असल्‍याने त्‍याला पोलिसांनी उपचारासाठी उपजिल्‍हा रुग्‍णालयात पाठवून दिले. त्‍यानंतर दोन्ही कामगारांकडून सायंकाळी उशिरापर्यंत तक्रार नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू होती.