खुशबू बचतगट राज्यात प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खुशबू बचतगट राज्यात प्रथम
खुशबू बचतगट राज्यात प्रथम

खुशबू बचतगट राज्यात प्रथम

sakal_logo
By

54580
मुंबई ः प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र ग्रामविकास व पंचायती राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते स्वीकारताना जिल्हा प्रकल्पाचे संचालक राजेंद्र पराडकर व जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार.

खुशबू बचतगट राज्यात प्रथम

ग्रामीण जीवनोन्नती अभियान; कलमठमधील महिलांच्या कष्टाचे चिज

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ ः महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण महिलांच्या यशकथा दृकश्राव्य स्वरुपात संकलित व्हाव्यात, यासाठी राज्यस्तरावर लघुपट, माहितीपट, चित्रफीत निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जिल्हा अभियान कक्षाकडून एकूण पाच चित्रफिती सादर करण्यात आल्या होत्या. त्यातील कलमठ येथील खुशबू स्वयंसहाय्यता बचतगटाला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. यासाठी बचतगटाला तीन लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. याबाबत जिल्हा अभियान कक्षाचे जिल्हा प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर व जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार यांचा ग्रामविकास व पंचायती राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते वाशी मुंबई येथे आज प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
नवी मुंबई-वाशी येथे झालेल्या या कार्यक्रमाला ‘उमेद’चे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, अवर सचिव धनंजय माळी, संचालक डॉ. राजाराम दिघे आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्हा कक्षाकडून या स्पर्धेसाठी एकूण पाच बचतगटांच्या चित्रफिती सादर करण्यात आल्या होत्या. यामध्ये कणकवली तालुक्यातील कलमठ येथील खुशबू बचतगट, खारेपाटण येथील श्री समर्थ कृपा बचतगट, बिडवाडी येथील जागृती ग्रामसंघ, कुडाळ तालुक्यातील कुंदे येथील आई पावणाई समूह, माणगाव येथील देवी यक्षिणी बचतगट यांचा समावेश होता. यातील कलमठ येथील खुशबू स्वयंसहाय्यता बचतगटाच्या चित्रफितीला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
................
चौकट
मसाल्यापासून व्यवसाय
खुशबू बचतगट मसाल्यापासून विविध प्रक्रिया व्यवसाय करीत आहे. बँक आणि बचतगट यांच्या समन्वयातून शाश्र्वत रोजगार महिलांना मिळाला आहे. मसाले उत्पादन प्रक्रिया व्यवसाय करणाऱ्या या बचतगटाची सात मिनिटांची चित्रफीत सादर केली होती. तिला पहिला क्रमांक मिळाला आहे.