कॅरम स्पर्धेत द्रोण हजारे याला दुहेरी मुकुट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॅरम स्पर्धेत द्रोण हजारे याला दुहेरी मुकुट
कॅरम स्पर्धेत द्रोण हजारे याला दुहेरी मुकुट

कॅरम स्पर्धेत द्रोण हजारे याला दुहेरी मुकुट

sakal_logo
By

कॅरम स्पर्धेत द्रोण हजारे याला दुहेरी मुकुट
देवरूख ः संगमेश्वर तालुका कॅरम असोसिएशनतर्फे १ आणि २ ऑक्टोबरला देवरूख येथे खेळवण्यात आलेल्या तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत देवरूखच्या द्रोण हजारे याने दुहेरी मुकुटाचा सन्मान पटकावला. या स्पर्धा खालची आळी येथील सत्यनारायण बालप्रासादिक मित्रमंडळाच्या जागेत खेळवण्यात आल्या. यात सबज्युनियर आणि ज्युनियर अशा दोन गटांचे विजेतेपद द्रोणने पटकावले. तो पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल साडवलीमध्ये सातवीत शिकत आहे.
-------
जिल्हा परिषद गटविभाग प्रमुखपदी अनिल मोरे
संगमेश्वर ः धामापूरतर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गटविभाग प्रमुखपदी अनिल मोरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. कित्येक वर्षे माखजन धामापूर गटामध्ये कट्टर निष्ठावान शिवसैनिक म्हणून तसेच विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले होते. आता पुन्हा एकदा शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी मोरे यांची विभागप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे धामापूर जि. प. गटामधील शिवसैनिक यांच्याकडून मोरे यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. धामापूर जि. प. गटामध्ये पुन्हा एकदा नव्या जोमाने शिवसेना पक्ष संघटना बांधणीचे काम करणार असल्याचे मोरे यांनी नमूद केले आहे.
------------