नौका अपघाताची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नौका अपघाताची शक्यता
नौका अपघाताची शक्यता

नौका अपघाताची शक्यता

sakal_logo
By

नौका अपघाताची शक्यता
देवगड ः विजयदुर्ग (ता.देवगड) बंदरासमोरील खोल समुद्रात एक परप्रांतीय मच्छीमार नौका अपघातग्रस्त झाली. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी तटरक्षक दलासह स्थानिक पोलिस गस्तीनौकेने धाव घेतली. येथील पोलिस समुद्रात पाहणीस गेल्याची माहिती पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी दिली. घटनेचा तपास सुरू असल्याचे श्री. बगळे यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्पी कारवार येथील एक मच्छीमार नौका विजयदुर्ग समोरील खोल समुद्रात अपघातग्रस्त झाली. त्यावरील मच्छीमारांनी मदतीसाठी तटरक्षक दलाशी संपर्क साधला. रत्नागिरी तटरक्षक दलाने सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार रत्नागिरी तटरक्षक दल तसेच येथील पोलिस गस्तीनौकेसह समुद्रात रवाना झाले. सागरी पोलिस व येथील पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी समुद्रात पाहणीसाठी गेले. सुमारे १५ सागरी मैल अंतराबाहेर ही नौका असल्याची प्राथमिक माहिती आहे. नेमकी घटना काय आहे याची पोलिस माहिती घेत आहेत.