परप्रांतीय कामगारांकडून महिलेचा विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परप्रांतीय कामगारांकडून
महिलेचा विनयभंग
परप्रांतीय कामगारांकडून महिलेचा विनयभंग

परप्रांतीय कामगारांकडून महिलेचा विनयभंग

sakal_logo
By

परप्रांतीय कामगारांकडून
महिलेचा विनयभंग
दोडामार्ग, ता.४: कामानिमित्त तालुक्यात राहणाऱ्या दोघा परप्रांतीय कामगारांकडून परप्रांतीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना आज सायंकाळी घडली. विनयभंग करणाऱ्या त्या दोघांमध्ये एक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगाही आहे. ‘त्या’ दोघांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मूळ मध्यप्रदेश येथील ३३ वर्षीय महिलेच्या ओळखीचा असलेल्या शौकीन अली याचे मित्र महिपाल यादव (वय २२) आणि एक परप्रांतीय अल्पवयीन मुलगा पीडिता राहत असलेल्या खोलीवर गादी नेण्याच्या बहाण्याने आले. आत आल्यावर त्या दोघांनी महिलेचा विनयभंग केला. तसेच पाईपने मारहाण करुन दमदाटी व शिविगाळही केली. पीडितेने येथील पोलिसांत फिर्याद देताच दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला.