कणकवलीत एसटी वेळापत्रक कोलमंडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत एसटी वेळापत्रक कोलमंडले
कणकवलीत एसटी वेळापत्रक कोलमंडले

कणकवलीत एसटी वेळापत्रक कोलमंडले

sakal_logo
By

kan62.jpg
54666
कणकवलीः येथील बसस्थानकावर पावसामुळे आणि बसगाड्या अभावी प्रवाशांची झालेली गर्दी.
---------
कणकवलीत एसटी वेळापत्रक कोलमंडले
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ६ः सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाचे साधन असलेल्या एसटी बसचे वेळापत्रक कोलमंडल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. कणकवली शहर आणि परिसरात आज पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे येथील बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली. एसटी महामंडळाचे वेळापत्रक पूर्व पदावर येत असताना अजूनही नागरिकांना पूर्वीप्रमाणे बस फेऱ्या सुरू झाल्या नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.
गावांकडे जाणाऱ्या अनेक बसेस वेळेवर सुटत नाहीत. अशा तक्रारी आहेत. याबाबत गावागावातून लेखी निवेदने विभाग स्तरावर दिली जात आहेत. एसटी महामंडळाच्या ताब्यात नव्या गाड्या अद्यापही मिळालेल्या नाहीत. त्यामुळे असलेल्या जुन्या गाड्यांवर एसटीचा डोलारा हाकला जात आहे. कणकवली आगारांमध्ये आज तब्बल सात बस गाड्या ब्रेकडाऊन असल्याने एसटीच्या नियमित वेळापत्रकावर परिणाम झाला असे एसटीच्या स्थानक प्रमुखांकडून सांगण्यात आले. अनेक मार्गांवरच्या एसटी बस गाड्या उशींराने सोडल्या जात होत्या. तर काही गाड्या रद्द केल्या जात होत्या. त्यामुळे येथील बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. दमदार कोसळणारा पाऊस त्यातच एसटी बस गाड्यांच्या वेळापत्रकाचा झालेला भट्याबोळ यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता.