विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य - राजन तेली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य - राजन तेली
विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य - राजन तेली

विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य - राजन तेली

sakal_logo
By

swt610.jpg
L54680
सिंधुदुर्गनगरीः भाजप प्रणित सरपंच, उपसरपंच संघटना निवडीनंतर कार्यकारिणीसोबत जिल्हाध्यक्ष राजन तेली, संघटना जिल्हाध्यक्ष दादा साईल आदी.

विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य
भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची ग्वाही; सिंधुदुर्गनगरीत सरपंच संघटनेची निवड
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ः सरपंचपदाचा कालावधी संपत आला तरी संघटनेच्या माध्यमातून आदर्श काम निर्माण करून येणाऱ्या निवडणुकीत गाव विकासासाठी भाजप प्रणित सरपंच आणि सदस्य निवडून येण्यासाठी पुढाकार घ्यावा. गावातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी भाजप कटिबद्ध असून त्याकरिता आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिली.
जिल्ह्यातील भाजपप्रणित सरपंच, उपसरपंच यांची नव्याने संघटना स्थापन केल्याची घोषणा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ओरोस येथे नुकतीच केली. संघटनेच्या अध्यक्षपदी पणदूर सरपंच तथा भाजप ओरोस मंडळ अध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साईल यांची निवड करण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व भाजपप्रणित सरपंच, उपसरपंच गेली दोन वर्षे संघटना निर्मितीसाठी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते; परंतु कोरोना कालावधीमुळे याबाबत कार्यवाही करता येत नव्हती. अखेर जिल्हाध्यक्ष तेली यांनी जिल्ह्यातील प्रमुख सरपंचांची बैठक घेऊन संघटनेची स्थापना करत असल्याची घोषणा केली. यावेळी सर्वानुमते पणदूर सरपंच दादा साईल यांची संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून नेमळे सरपंच विनोद राऊळ यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. सहउपाध्यक्षपदी हडपीड सरपंच दाजी राणे, तुळसुली सरपंच नागेश आईर आणि महिला उपाध्यक्षपदी नांदगाव सरपंच आफ्रोज नावलेकर, सरचिटणीसपदी हडी सरपंच महेश मांजरेकर, सहसरचिटणीसपदी असलदे सरपंच गुरुप्रसाद उर्फ पंढरी वायंगणकर, परबवाडा सरपंच विष्णू उर्फ पप्पू परब, संघटक म्हणून रोणापल सरपंच सुरेश गावडे, खजिनदारपदी करंजे सरपंच मंगेश तळगावकर, चिटणीसपदी माडखोल सरपंच संजय शिरसाट, गावराई सरपंच उदय नारळीकर, सल्लागारपदी निरवडे माजी सरपंच प्रमोद गावडे, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष तेली यांनी, गेली पाच वर्षे जिल्ह्यातील सर्व सरपंच सातत्याने मागणी करत असलेल्या घर बांधकाम परवानगी, पथदीप बिलांचा प्रश्न त्याचप्रमाणे ''आपले सरकारट सेवा केंद्रातील अडचणी दूर करण्यासाठी आणि जलजीवन मिशनमधील तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसोबत एकत्रित बैठक घेऊन हा प्रश्न तत्काळ मार्गी लावणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश राऊळ, नारायण आरडेकर-नागवे, हनुमंत पेडणेकर (मळगाव), दीनानाथ कशाळीकर (सातुळी), दीपक सुर्वे (चिंदर), सुभाष दळवी (पडवे), वैभव साळस्कर (साळशी), सुहास राणे (पिसेकामते), महेश शिरवलकर (शिरवल), नीलेश खोत (मळगाव), महेश राजे (वजराट), दिलीप तवटे (कुपवडे), राहुल गावडे, शैलेश निवरेकर, साबाजी गावडे (गोळवण-कुमामे) आदी उपस्थित होते. रोणापाल सरपंच गावडे यांनी आभार मानले.

चौकट
लवकरच जिल्हा दौरा
जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याबाबत साईल यांनी आभार व्यक्त केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष तेली यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या माध्यमातून आदर्शवत काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. येत्या काही दिवसांत संघटनात्मक बांधणीसाठी आठही तालुक्यांचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.