रत्नागिरी-देसाई हायस्कूल येथे माहिती अधिकार दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-देसाई हायस्कूल येथे माहिती अधिकार दिन साजरा
रत्नागिरी-देसाई हायस्कूल येथे माहिती अधिकार दिन साजरा

रत्नागिरी-देसाई हायस्कूल येथे माहिती अधिकार दिन साजरा

sakal_logo
By

देसाई हायस्कूलमध्ये माहिती अधिकारदिन
रत्नागिरी ः प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणाऱ्या कौशल्याचा शोध घ्यावा व त्या कौशल्याचा विकास करावा, असे मत मराठा मंदिर स. रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे प्रा. राहुल बर्वे यांनी व्यक्त केले. मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात त्या वेळी ते बोलत होते. मुख्याध्यापक प्रमोद शेखर, अंजली पिलणकर, संतोष गार्डी, विनोद गावखडकर, मिनाल नाखरेकर, जयसिंग लोहार, वृषाली सावंत उपस्थित होते. माहिती अधिकार म्हणजे काय या विषयी बर्वे यांनी अभ्यासपूर्ण साध्या व सोप्या मुलांना समजेल अशा ओघवत्या शब्दात माहिती अधिकाराविषयी माहिती दिली. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माहितीचा अधिकार या विषयी निबंध लिहिण्याचे आवाहन केले.