रत्नागिरी-श्रीराम मंदिरात राजेशाही थाटात दसरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-श्रीराम मंदिरात राजेशाही थाटात दसरा
रत्नागिरी-श्रीराम मंदिरात राजेशाही थाटात दसरा

रत्नागिरी-श्रीराम मंदिरात राजेशाही थाटात दसरा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat६p१.jpg-KOP२२L५४६६७ रत्नागिरी ः राजेशाही दसऱ्यामध्ये अश्वपूजन करताना माजी खासदार नीलेश राणे व मान्यवर.
-rat६p२.jpg- KOP22L54658 सोने लुटण्याच्या कार्यक्रमापूर्वी आपट्याच्या वृक्षपूजनाप्रसंगी नीलेश राणे आणि मान्यवर.
----------------

श्रीराम मंदिरात राजेशाही थाटात दसरा

सोने लुटण्यासाठी रत्नागिरीकरांची गर्दी ; शस्त्रपूजन, अश्‍वपूजन
रत्नागिरी, ता. ६ ः रत्नागिरीच्या प्रसिद्ध श्रीराम मंदिरात राजेशाही दसरा उत्साही वातावरणात पार पडला. मंत्र पुष्पांजलीचा निनाद... वेदांचे पठण... आणि शास्त्रोक्त पूजन अशा आल्हाददायक आणि उत्साही वातावरणात राजेशाही दसर्‍यात सोने लुटण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली. शस्त्रपूजन, अश्‍वपूजन आणि तुळजाभवानीचे पूजन करून श्रीराम मंदिरात सोने लुटण्यासाठी झुंबड उडाली.
रत्नागिरीत बुधवारी विजयादशमीनिमित्त श्रीराम मंदिराच्या प्रांगणात देवी तुळजाभवानीसमोर राजेशाही दसऱ्याचा सोहळ्याने वातावरणात चैतन्य आले होते. सोहळ्याला माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह उल्हासराव घोसाळकर, श्रीराम मंदिर देवस्थानच्या अध्यक्षा उर्मिला घोसाळकर, सर्व मानकरी विश्‍वस्त उपस्थित होते.
दसऱ्याची मुहूर्तमेढ श्रीराम मंदिर संस्थानच्यावतीने रोवण्यात आली. हा राजेशाही दसरा साजरा करण्यापूर्वी अश्‍वांची मिरवणूक काढण्यात आली. नीलेश राणे या मिरवणुकीत सहभागी झाले. ढोल-ताशांचा गजर आणि लेझिमच्या ठेक्यावर महिलांनी या मिरवणुकीची शोभा वाढवली. वाजतगाजत अश्‍वांची मिरवणूक मुख्य बसस्थानकातून पुरातन व प्रसिद्ध असलेल्या श्रीराम मंदिराबाहेर दाखल झाली आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून निघाला.
श्रीराम मंदिरात नीलेश राणे दाखल होताच त्यांचे विश्‍वस्तांनी स्वागत केले. त्यांच्या हस्ते श्रीराम दरबारात पूजन करण्यात आले. त्यांच्या हस्ते तुळजाभवानीचे पूजन झाले. या वेळी शस्त्रांची पूजा आयोजित केली होती. पुरातन तलवारी, बंदुका अशी विविध शस्त्रे पूजनासाठी श्रीराम मंदिराच्या प्रांगणात मांडण्यात आली होती. ११ चौरंग, ११ तलवारी आणि बंदुका यांचे शस्त्रपूजन झाले. अश्‍वपूजन, शमीपूजन झाले. वेदमंत्राच्या घोषात राजेशाही रिवाजानुसार सर्व विधी पार पडले. अश्‍वांची ओवाळणी झाल्यानंतर वेदमंत्रांच्या घोषात आपट्याच्या वृक्षाचे पूजन उर्मिला घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीराम मंदिर देवस्थानचे विश्‍वस्त उल्हासराव घोसाळकर यांच्या हस्ते सोने लुटण्याचा विधी झाला. श्रीराम मंदिराच्या प्रांगणात सोने लुटण्यासाठी झुंबड उडाली होती.

चौकट
यजमानांकडून शस्त्रपूजन
शस्त्रपूजनाकरिता राणे, नित्यानंद दळवी, महेंद्रशेठ साळवी, प्रसन्न आंबुलकर, उपेंद्र सुर्वे, मुकुंद काळे, भाई नाचणकर, विकास पाटील, किशोर मोरे, सुधाकर सावंत यांच्यासह ११ यजमान पूजेकरिता बसले होते. रत्नागिरीतील प्रख्यात पुरोहित श्रीराम मंदिरामध्ये आले होते. पुरोहितांनी मंत्रपुष्पांजली करून यजमानांकडून शस्त्रपूजन करून घेतले.