रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

प्रा. श्रीधर शेंड्ये यांच्यावरील लेखनसंग्रहाचे आज प्रकाशन
रत्नागिरी ः येथील प्रसिद्ध प्राध्यापक (कै.) श्रीधर शेंड्ये यांच्यावरील लेखनसंग्रहाचे शुक्रवारी (ता. ७) प्रकाशन होणार आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत जयस्तंभ येथील महिला मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला आहे. स्मृतिग्रंथ प्रकाशित होत आहे. ''श्रीपर्व'' नावाच्या या ग्रंथात विविध क्षेत्रातील मान्यवर, सहप्राध्यापक, विद्यार्थी आणि आप्त यांच्या लेखांबरोबरच प्रा. शेंड्ये यांनी केलेल्या लेखनाचेही संकलन आहे. या पुस्तकासोबत प्रा. सुजन शेंड्ये यांच्या ''बिल्वदल'' या लेखसंग्रहाचेही प्रकाशन होणार आहे. माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ होईल. दिलीप भाटकर यांच्या हस्ते श्रीपर्वचे तर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांच्या हस्ते बिल्वदलचे प्रकाशन होईल. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मोहिनी पटवर्धन, सुजन शेंड्ये यांनी केले आहे.

जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीतर्फे क्रॅश कोर्स
रत्नागिरी ः रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरूअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे पोलिस भरती, तलाठी भरती, आरोग्यसेवक भरती, जिल्हा परिषद भरती या स्पर्धा परीक्षांसाठी कॅश कोर्सचे आयोजन केले आहे. स्थानिक विद्यार्थी पदभरतीची जाहिरात आल्याशिवाय अभ्यासाला सुरवात करत नाहीत. जाहिरात आल्यानंतर अभ्यास करायला घेतला तर पुरेसा अवधी मिळत नाहीत. कारण, जाहिरातीचा दिनांक आणि परीक्षेची तारीख यांमध्ये कमी कालावधी असतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिकता बदलणे जरूरीचे असून जाहिरात येण्यापूर्वीच अभ्यासाची तयारी करणे गरजेचे आहे. त्याकरिता अकादमीने या कोर्सचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अरूअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमी, खातू नाट्यमंदिराच्या मागे, रत्नागिरी येथे संपर्क साधावा.
--------

दापोलीत सप्ताहदान उत्सव
दाभोळ ः ज्ञानदीप दापोली, संतोष भाई मेहता फाउंडेशन व लायन्स क्लब दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने सप्ताहदान उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. दापोली तालुक्यात २३ आदिवासी वाड्या असून इतर अनेक ठिकाणच्या वाडी-वस्तीवरील अनेक गरजू कुटुंबे दुर्गम भागात राहतात. या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य जसे दप्तर, वॉटरबॅग, वह्या, स्टेशनरी साहित्य, कलर्स, दैनंदिन जीवनातील कपडे, हिवाळ्यासाठी गरम कपडे, चादरी व गोधडी इ. वस्तूची गरज आहे. त्यामुळे आपल्या घरातील वापरण्यायोग्य वस्तू ज्ञानदीप दापोलीचे संस्था कार्यालय दापोली, डीएनएस बँकेजवळ, दापोली तहसील कार्यालयासमोर ८ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.