रत्नागिरी- मराठा भूषण पुरस्कार साळवी यांना प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- मराठा भूषण पुरस्कार साळवी यांना प्रदान
रत्नागिरी- मराठा भूषण पुरस्कार साळवी यांना प्रदान

रत्नागिरी- मराठा भूषण पुरस्कार साळवी यांना प्रदान

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat६p.jpg- रत्नागिरी : क्षत्रिय मराठा मंडळातर्फे मराठा भूषण पुरस्कार माजी न्यायमूर्ती उमेश साळवी यांना प्रदान करताना मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे. डावीकडून संतोष तावडे, उल्हासराव घोसाळकर, राकेश नलावडे, जितेंद्र विचारे.
------------

न्यायमूर्ती साळवीना मराठा भूषण पुरस्कार प्रदान
क्षत्रिय मराठा मंडळ; जितेंद्र विचारे यांना मराठा समाजगौरव
रत्नागिरी, ता. ६ : क्षत्रिय मराठा मंडळाचा १५ वा वर्धापन नुकताच साजरा झाला. याप्रसंगी मराठा समाज भूषण पुरस्कार माजी न्यायमूर्ती (उच्च न्यायालय) उमेश डी. साळवी यांना आणि मराठा समाज गौरव पुरस्कार नगरपालिकेच्या वाहन विभागाचे प्रमुख जितेंद्र विचारे यांना प्रदान करण्यात आला. कोरोना कालावधीतील त्यांनी केलेल्या अलौकिक व धाडसाच्या कामासाठी हा पुरस्कार मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांच्या हस्ते प्रदान केला.
अंबर हॉल येथे कार्यक्रम झाला. सत्काराला उत्तर देताना माजी न्यायमूर्ती उमेश साळती यांनी कारकिर्दीमधील विविध न्यायदानाचे किस्से सांगितले. जितेंद्र विचारे यांनी कोरोना कालावधीतील कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे बळ मला माझ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे मिळाल्याचे सांगितले.
अध्यक्षस्थानी सुरेशराव सुर्वे होते. संतोष तावडे, राकेश नलावडे, जितेंद्र विचारे, संपादक उल्हासराव घोसाळकर उपस्थित होते. दीपप्रज्वलन वंदना देसाई, प्राची शिंदे, मगदूम काकी, आशा साळवी, शुभांगी इंदूलकर यांच्या हस्ते झाले. अभिलाषा ग्रुपने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
सुरेशराव सुर्वे यांनी समाज मराठा बंधू भगिनींना जास्तीत जास्त मंडळाच्या कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्याध्यक्ष राकेश नलावडे यांनी मंडळासाठी जास्तीत जास्त वेळ तरुणांनी देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन सौ. मैथिली जाधव व मंडळाचे सरचिटणीस योगेश साळती यांनी केले. कौस्तुभ सावंत यांचे सहकार्य लाभले. धनश्री पालांडे यांनी आभार मानले.


विद्यार्थी, ज्येष्ठांचा सत्कार
मंडळाच्या ज्या आजीव सभासदांची वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत अशा सभासदांचे सत्कार मंडळाच्या पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा समाजातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेले बंधू, भगिनी, एनईईटी, स्कॉलरशीप, सी.ए., पदवी या परीक्षांमध्ये उल्लेखनिय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. (कै.) मालती देसाई यांच्या स्मरणार्थ मंडळातर्फे घेण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक देऊन गौरवले. मंडळाच्या वतीने ९० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक श्रीमती शकुंतला पांडुरंग सावंत (नाचणे) तसेच श्रीमती प्रेमलता वासुदेव सावंत (पॉवरहाऊस, नाचणे रोड) यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.