रिमा साटम ठरल्या पैठणीच्या मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिमा साटम ठरल्या पैठणीच्या मानकरी
रिमा साटम ठरल्या पैठणीच्या मानकरी

रिमा साटम ठरल्या पैठणीच्या मानकरी

sakal_logo
By

रिमा साटम ठरल्या पैठणीच्या मानकरी
कणकवलीः शहरातील बांधकरवाडी मित्रमंडळाच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी आयोजित केलेल्या खेळ पेठणीचा स्पर्धेत रिमा साटम विजेत्या ठरल्या. त्यांना नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सोनू सुदडेकर, मारुती राणे, विष्णू राणे, विश्वनाथ राणे, हरी राणे, संजय राणे, भाई ठाकूर, राजन साटम, मनोज राणे, नाना राणे, सुमित राणे, रजत राणे, राहुल ठाकूर आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे नगरसेवक नाईक यांनी कौतुक केले.
................
करुळ येथे वन्यजीव सप्ताह
वैभववाडीः येथील वनविभागाच्यावतीने करुळ, कोळपे व भुईबावडा येथे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. करुळ येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रम प्रसंगी वैभववाडीचे वनपाल सदाशिव वागरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सोमनाथ पाटील, वनरक्षक अमीर काकतीकर, किरण पाटील, उत्तम कांबळे, मुख्याध्यापक दीपक घाटगे व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
...................
रक्तदान शिबिरास फोंडाघाटला प्रतिसाद
वैभववाडीः नवरात्रोत्सवानिमित्त नवीन कुर्ली वसाहत येथे आयोजित रक्तदान शिबिरात ३३ दात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमाचे फोंडाघाट सरपंच संतोष आंग्रे, लोरे सरपंच अजय रावराणे यांनी कौतुक केले. फोंडाघाट येथील नवदुर्गा मंडळाने या शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ. पद्मश्री हळदणकर, ग्रामविकास अधिकारी विकास कोलते, जिल्हा रक्तपेढी विभाग कर्मचारी प्रांजली परब, मयुरी शिंदे, सुनील वारोळे, सुरेश डोंगरे, नितीन गावकर आदी उपस्थित होते.
..................