मंडणगड - अंधश्रद्धेच्या जास्त बळी आणि वाहक महिलाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड - अंधश्रद्धेच्या जास्त बळी आणि वाहक महिलाच
मंडणगड - अंधश्रद्धेच्या जास्त बळी आणि वाहक महिलाच

मंडणगड - अंधश्रद्धेच्या जास्त बळी आणि वाहक महिलाच

sakal_logo
By

rat6p15.jpg ःKOP22L54704 आंबडवे ः आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सचिन गोवळकर व कार्यक्रमास उपस्थित मान्यवर.

महिलाच अंधश्रद्धेच्या जास्त बळी, वाहक
अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष; आंबडवे महाविद्यालयात मार्गदर्शन
मंडणगड, ता. ६ ः अंधश्रद्धेच्या जास्तीत जास्त बळी व वाहक महिला असल्याने स्त्रिया आणि अंधश्रद्धा हा विषय खूप महत्त्वाचा आहे. ज्या शोषणाच्या बळी असतात, त्या अंधश्रद्धा महिला अतिशय सन्मानाने, अभिमानाने मिरवत असतात. सगळ्याच धर्मांनी स्त्रियांना गौणत्व दिलं आहे. त्याचबरोबर स्त्रियांच आरोग्य आणि अंधश्रद्धा विविध उदाहरणे देऊन अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर यांनी मार्गदर्शन केले.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा मंडणगड व विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्त्री शक्तीचा जागर’ अभियानांतर्गत ‘स्त्री आणि अंधश्रद्धा’ या विषयावर विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आंबडवे येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
गोवळकर म्हणाले, स्त्रियांची व्रतवैकल्ये ही नवऱ्यासाठी किंवा मुलांसाठी केलेली असतात. म्हणजेच पितृसत्तेचे अस्तित्व टिकवण्यासाठी महिला व्रतवैकल्ये करतात. त्यांना निश्चितपणे अंधश्रद्धेच्या मानसिक गुलामगिरीकडे ढकलत असतात. अशावेळी या स्त्रिया बाबा-बुवा, मांत्रिक, भगत, देवऋषी यांचा आधार घेतात.’ या वेळी विधवा प्रथा निर्मूलन करण्याबाबत मार्गदर्शन गोवळकर यांनी केले. वैज्ञानिक दृष्टिकोन महिलांमध्ये रूजला नसल्याने महिला अंधश्रद्धेच्या बळी जातात, असे मत या वेळी नमूद करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रा. अरुण ढंग यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप सहकार्य केले.