रत्नागिरी- इन्फिगो आय हॉस्पीटलमध्ये शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- इन्फिगो आय हॉस्पीटलमध्ये शिबिर
रत्नागिरी- इन्फिगो आय हॉस्पीटलमध्ये शिबिर

रत्नागिरी- इन्फिगो आय हॉस्पीटलमध्ये शिबिर

sakal_logo
By

इन्फिगो आय हॉस्पिटलमध्ये
काचबिंदू तपासणी, निदान शिबिर
रत्नागिरी, ता. ६ ः साळवी स्टॉप येथील इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये सोमवारी (ता. १०) काचबिंदू विशेष तपासणी व निदान शिबिराचे आयोजन केले आहे. इन्फिगोमधील ग्लुकोमातज्ज्ञ डॉ. स्वानंद देशपांडे यांनी काचबिंदूचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. १० ऑक्टोबरला सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत काचबिंदू असलेल्यांच्या तपासणीसाठी उपलब्ध असणार आहेत.
काचबिंदूमुळे दृष्टी हळूहळू नष्ट झाल्याने ती आपल्या लक्षात येत नाही व जेव्हा समजून येते तेव्हा खूप उशीर झाल्याने दृष्टीची कायमची हानी झालेली असते. वेळेत उपचार न केले गेल्यास उपचाराअभावी दृष्टी कायमची गमावण्याची वेळ येते. चाळीशी पार केलेल्यांना याचा धोका अधिक असतो व काही प्रमाणात हा आजार अनुवांशिक असू शकतो. त्यामुळे घरातील कोणालाही ग्लुकोमा किंवा काचबिंदू असल्यास कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील सर्वांच्या डोळ्याची तपासणी आवश्यक असते. यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

काचबिदूंची लक्षणे
काचबिदूंच्या लक्षणामध्ये धुसर दिसणे, प्रकाशाभोवती इंद्रधनुष्य वलय दिसणे, डोके दुखणे, उलटी होणे व दृष्टी हळूहळू कमजोर होणे ही लक्षणे दिसतात. काचबिंदू सामान्यतः दोन्ही डोळ्यात येतो व त्याचे निदान नियमित तपासणीच्या वेळी होते. यासाठी टोनोमेट्री, ऑप्थाल्मोस्कोपी, गोनिओस्कोपी पेरीमेट्री तपासण्या केल्या जातात. काचबिंदूंचे दोन प्रकार आहेत.