रत्नागिरी-क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-क्राईम
रत्नागिरी-क्राईम

रत्नागिरी-क्राईम

sakal_logo
By

कोकण रेल्वेतील प्रवाशाच्या
बॅगमधील १९ हजाराचा ऐवज लंपास
रत्नागिरी ः रेल्वेच्या कोच्चिवली एलटीटी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगमधून १९ हजारांचा मुद्देमाल पळवणाऱ्या संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ ते २६ ऑगस्ट दुपारी दीडच्या रत्नागिरीतील भोके रेल्वे स्टेशनदरम्यान घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुजीब राहिमान मोहम्मद मुथुवाडन (वय ४७, रा. परप्पूर कोटक्कल, राज्य केरळ) हे तिरुर केरळ ते पनवेल असा कोच्चिवली एलटीटी एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना चोरट्याने त्यांच्या बॅगमधील पर्समधून रोख रक्कम १७ हजार व २ हजार रुपयांचा पॉवरबॅंक असा सुमारे १९ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला. या प्रकरणी मुथुवाडन यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल वाजे करत आहेत.
-----
हातखंब्यात दारू अड्ड्यावर छापा
रत्नागिरी ः शहरानजीकच्या हातखंबा येथे विनापरवाना हातभट्टी दारू विकणाऱ्या दोन अड्ड्यांवर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. दोन संशयितांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोन्ही मिळून १७ लिटर दारू व ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रकाश रामा धनावडे (वय ४९) व विठ्ठल बाळका धनावडे (५४, दोघेही रा. मासेबाव, धनावडेवाडी-रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना बुधवारी (ता. ५) रात्री आठ ते दहा या कालावधीत निदर्शनास आल्या. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार विनापरवाना हातभट्टीची गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकाकडे ४५५ रुपयांची ८ लिटर दारू तर दुसऱ्याकडे ५०५ रुपयांची ९ लिटर दारू सापडली. या प्रकरणी पोलिस नाईक भैरवनाथ सवाईराम व गौरव कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.