गुहागर ः वडिलांनी बांधलेल्या बसथांब्याचा मुलांनी केला जीर्णोद्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः वडिलांनी बांधलेल्या बसथांब्याचा मुलांनी केला जीर्णोद्धार
गुहागर ः वडिलांनी बांधलेल्या बसथांब्याचा मुलांनी केला जीर्णोद्धार

गुहागर ः वडिलांनी बांधलेल्या बसथांब्याचा मुलांनी केला जीर्णोद्धार

sakal_logo
By

rat६p३९.jpg ःKOP२२L५४७८३ चिखली साळवीवाडी येथे बांधण्यात आलेला नवा बसथांबा.

वडिलांनी बांधलेल्या बसथांब्याचा जीर्णोद्धार
मुलांने फेडले पितृऋण ; चिखलीतील दळवी कुटुंबीय
गुहागर, ता. ६ ः गुहागर तालुक्यातील चिखली साळवीवाडी येथील नव्या बसथांब्याचे उद्घाटन येथील दळवी कुटुंबीयांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आले. १९८९ मध्ये हा बसथांबा (कै.) सीताराम दळवी व (कै.) सौ. जयवंती दळवी यांच्या स्मरणार्थ तुकाराम दळवी यांनी बांधला होता. तुकाराम दळवी यांचा मुलगा विजय दळवी व कुटुंबीयांनी महामार्गाच्या कामात तोडलेला बसथांबा पुन्हा बांधला.
गुहागर तालुक्यातील चिखली साळवीवाडी येथील तुकाराम दळवी व कुटुंबीयांनी १९८९ मध्ये आपल्याच जागेत मोफत बसथांबा बांधला होता; मात्र तो गुहागर-विजापूर महामार्ग रस्ता रुंदीकरणात काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे गेले वर्षभर येथील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. उन्हाळा व पावसाळ्यात प्रवाशांना उघड्यावरच उभे राहून बसची वाट पाहावी लागत असे. ही गैरसोय लक्षात घेऊन येथील तरुण मंडळी संजय साळवी, अभिजित साळवी, अमित साळवी आणि विशाल साळवी यांनी बसथांबा बांधण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान (कै.) सीताराम दळवी व (कै.) सौ. जयवंती दळवी यांचा नातू विजय तुकाराम दळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला. सुमारे १ लाखाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला. त्यातूनच हा बसथांबा उभा राहिला. या थांब्याच्या उद्घाटनावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ प्रभाकर साळवी, विजय दळवी, सिद्धेश साळवी, विराज साळवी, साहिल साळवी, संदीप साळवी, संजय साळवी, अभिजित साळवी, अमित साळवी आणि विशाल साळवी आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. या थांब्याच्या समोरील विरुद्ध दिशेला ग्रामस्थांच्या सहकार्यातून आणखी एक बसथांबा बांधण्यात येणार असल्याची माहिती संजय साळवी यांनी दिली.