रस्त्यालगतची झाडे ठरताहेत कर्दनकाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यालगतची झाडे ठरताहेत कर्दनकाळ
रस्त्यालगतची झाडे ठरताहेत कर्दनकाळ

रस्त्यालगतची झाडे ठरताहेत कर्दनकाळ

sakal_logo
By

swt630.jpg
54817
कसई केळीचे टेंबः येथील उगाडेकर यांच्या घराजवळच्या याच फांदीमुळे एसटीचा अपघात झाला होता.

swt631.jpg
54818
दोडामार्गः तिलारी मार्गावरील झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होण्याची गरज आहे.

रस्त्यालगतची झाडे ठरताहेत कर्दनकाळ
दोडामार्ग तालुकाः बांधकाम विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ६ः रस्त्यालगतची अनेक झाडे वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. गेल्या काही दिवसात त्या झाडांमुळे झालेले अपघात पाहता धोकादायक झाडे आणि फांद्या हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
दोडामार्ग-तिलारी-वीजघर, दोडामार्ग-बांदा, दोडामार्ग-सासोली-भरपाल-तळकट-बांदा या रस्त्यांसह अनेक अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा अनेक झाडे आहेत. त्यातीलच बहुतांश झाडे आकेशियाची आहेत. पावसाळयात त्यातील अनेक झाडे रस्त्याच्या दिशेने झुकली आहेत. अनेक झाडांच्या फांद्याही रस्त्यावर आल्या आहेत. काही फांद्या इतक्या खाली आल्यात की त्यांना वाचवण्यासाठी एसटी चालकांना गाडी चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या बाजूला न्यावी लागते. दोडामार्ग तिलारी मार्गावर कसई केळीचे टेंब येथे उगाडेकरांच्या घराजवळ अशाच प्रयत्नात एसटी रस्ता सोडून बाहेर गेली होती. सुदैवाने मोठा अपघात टळला. त्याच घटनास्थळापासून काही अंतरावर आणखी एक अपघात घडला. झाड मुळापासून उन्मळून रस्त्यावर पडले आणि दोडामार्गकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या मागे बसलेली एक महिला डोक्यावर त्या झाडाचा फटका बसल्याने गंभीर जखमी झाली होती. अशा अनेक घटना सातत्याने घडत असतात. अनेकदा झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प होते. रस्त्यालगतची झाडे सावली देता देता मृत्यूलाही आमंत्रण देत असल्याने धोकादायक झाडे आणि फांद्या तोडण्याची गरज आहे.
-----------
चौकट
झाडे यामुळे कोसळतात
आकेशियाच्या झाडांना पाणी खूप लागते. त्या झाडांची मुळे सरळ आत खोलवर जाण्याऐवजी पाणी शोधण्यासाठी आपल्या आजूबाजूला जमिनीला समांतर जातात. त्यामुळे मुळे जमिनीत घट्टपणे रोवली जात नाहीत. साहजिकच जमिनीची धूप झाल्याने अथवा मुसळधार पाऊस किंवा जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे झाडाची मुळे वरच्यावर असल्याने ती टिकाव धरू शकत नाहीत आणि झाडे उन्मळून जमीनदोस्त होतात.
-----------
‘सकाळ’ने वेधले सर्वप्रथम लक्ष
धोकादायक झाडे आणि फांद्यांमुळे अपघात होत असल्याचे वृत्त ''सकाळ''ने प्रसिद्ध केल्याने आपत्ती नियंत्रण कक्ष प्रमुख तथा तहसीलदार अरूण खानोलकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धोकादायक फांद्या हटवण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी काही ठिकाणच्या फांद्या हतवल्या; मात्र ते काम अगदीच प्राथमिक आनी किरकोळ स्वरूपाचे आहे. त्याला व्यापक स्वरूप येण्याची गरज आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
------
कोट
धोकादायक झाडे व फांद्या हटवण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ आमच्याकडे नाही. त्यामुळे काहीजणांना अधूनमधून रोजंदारीवर बोलावून काही फांद्या तोडण्यात आल्या आहेत. भविष्यात दोडामार्ग -आयी आणि दोडामार्ग-तिलारी-वीजघर मार्गावरील धोकादायक फांद्या व झाडें हटवून रस्ता निर्धोक बनविण्याचा प्रयत्न आहे.
- अनिल बडे, उपकार्यकारी अभियंता, सार्वजानिक बांधकाम विभाग, दोडामार्ग
--------