महिला नवदुर्गांचा बांद्यात सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला नवदुर्गांचा बांद्यात सन्मान
महिला नवदुर्गांचा बांद्यात सन्मान

महिला नवदुर्गांचा बांद्यात सन्मान

sakal_logo
By

swt६२९.jpg
५४८१६
बांदाः चैतन्य महिला विकास मंडळ बांदा, गडगेवाडीच्या अपर्णा आगलावे यांना सन्मानित करताना पदाधिकारी.


महिला नवदुर्गांचा
बांद्यात सन्मान
बांदा, ता. ६ः नवरात्रौउत्सव निमित्ताने बांद्यात महिला नवदुर्गा सन्मान कार्यक्रम करण्यात आला. यासाठी बांदा येथील पहिल्या काथ्या उदयोजीका, महिला बचत गट ट्रेनर , समाजसेवीका तसेच सिंधुदुर्गातील प्रथम महिला दशावतार नाट्य मंडळाला महाराष्ट्र शासन पुरस्कार मिळवून देणाऱ्या सौ. अपर्णा आगलावे यांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन शाखा व्यवस्थापक उमेश परब यांच्या हस्ते गौरव करण्यात आले. यावेळी विविध योजनांची माहिती देण्यात आली. संस्थेचे माहितीपत्रक वाटण्यात आले. यावेळी शाखा व्यवस्थापक परब, सहाय्यक लिपिक श्रीया पास्ते, सहाय्यक लिपिक सर्वेश प्रभु, आँफीस परिचर ज्ञानेश्वर येडवे उपस्थित होते. चैतन्य महिला विकास मंडळ, बांदा गडगेवाडी (ता. सावंतवाडी) यांची स्थापना २००६ ला झाली. यांनी सर्वप्रथम बांदा गावात महिला मंडळाच्या मार्फत काथ्या व्यवसाय सुरूवात केला.
रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, पाणी शुद्धीकरण, हॉटेल व्यवसाय, शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, दूध व्यवसाय, शेती व्यवसाय, भाजीपाला लागवड, दिपावली साहित्य, टेलरिंग व्यवसाय, महिला दशावतार नाटय मंडळ, असे अनेक उपक्रम या मंडळामार्फत राबवण्यात आले. नाट्य मंडळाला महाराष्ट्र शासन पुरस्कार मिळाला आहे. या नाटकाचे सादरीकरण पुणे, मुंबई, कर्नाटक या ठिकाणी झाले आहे. या सर्व गोष्टींची दखल घेत या मंडळाला सन्मानित करण्यात आले.