रत्नागिरी-रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी-रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी-रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी, ता. ६ ः रेल्वेच्या रत्नागिरी ते पानवल ट्रॅकवर तरुणाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला असून प्रथमदर्शी ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी मृत तरुणाच्या मोबाईलच्या आधारे तपासाला सुरवात केली आहे.
सुमित राजेश सावंत (वय २०, रा. मजगाव-बौद्धवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) दुपारी पावणेतीनच्या सुमारास रत्नागिरी ते पानवल जाणाऱ्या रेल्वेट्रॅकवर पानवल पुलाच्या अलीकडे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पानवल येथे पुलाच्या अलिकडे दिवा-सावंतवाडी या रेल्वेची धडक लागल्याने तो मृत झाला. या प्रकरणी मंदार सुनील पवार (वय ३५, रा. खेडशी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. खबर दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला. दरम्यान, या तरुणाचा मृत्यू म्हणजे आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्याच्या मोबाईलवरील मॅसेजवरून ही आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शी स्पष्ट होत आहे. पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत.