रत्नागिरी-धान्य दुकानदारांना आयएसओ मानांकनासाठी सक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-धान्य दुकानदारांना आयएसओ मानांकनासाठी सक्ती
रत्नागिरी-धान्य दुकानदारांना आयएसओ मानांकनासाठी सक्ती

रत्नागिरी-धान्य दुकानदारांना आयएसओ मानांकनासाठी सक्ती

sakal_logo
By

- rat६p४४.jpg- KOP२२L५४८०५ रत्नागिरी ः जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देताना जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी.
--------
धान्य दुकानदारांना आयएसओसाठी सक्ती
चालक-मालक संघटना नाराज ; पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी, ता. ६ ः रास्तदर धान्य दुकानदारांना आयएसओ मानांकन राबवण्यासाठी होत असलेली सक्ती आणि अन्य अडचणींसंदर्भात जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेतर्फे जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हा रेशनिंग संघटनेचे अध्यक्ष अशोकराव कदम, चिपळूण तालुकाध्यक्ष शशिकांत दळवी, गुहागर तालुकाध्यक्ष प्रकाश आग्रे, चिपळूण येथील रास्तदर धान्य दुकानदार ओंकार पाटणकर यांनी गुरुवारी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रजपूत यांची भेट घेतली. सध्या जिल्ह्यात तालुका पुरवठा विभागामाफत रास्तदर धान्य दुकाने आयएसओ मानांकन करण्यासाठी अटीशर्ती राबवण्याविषयी सक्ती केली जात आहे. मात्र ग्रामीण भागातील दुकानांची व्यवस्था पाहता १०० टक्के धान्य दुकाने आयएसओ करणे शक्य होणार नाही. त्यामुळे दुकानदारांवर सक्ती करण्यात येऊ नये अशी प्रमुख मागणी करण्यात आली. महसूल खात्यात पुरवठा विभाग सोडल्यास सर्वच विभागात डाटा ऑपरेटर पदे मानधनावर भरण्यात आलेली आहे. फक्त पुरवठा विभागात ही पदे भरण्याची व्यवस्था झाल्यास पुरवठा विभागाचेही काम सोईस्कर होणार आहे. त्याचप्रमाणे सर्व्हरबाबत दुकानदारांना तक्रारी निर्माण होतात. त्यावेळी नव्याने सूचना दिल्या जातात. अशावेळी धान्यदुकानदारांना एकत्र बोलावून मार्गदर्शन करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली.
जिल्ह्यातील अनेक रेशनिंग कार्डवर नावे कमी जास्त केल्याने युनिटची संख्याही कमीअधिक होत असते. हे काम पुरवठा विभागामार्फत केले जाते. परंतु प्रत्यक्षात ऑनलाईन पद्धतीने ती कमीजास्त होत नसल्याने तपासणीच्यावेळी याबाबत समस्या निर्माण होतात. त्यावेळी अधिकारी वर्ग दुकानदारांना जबाबदार धरीत असतात. युनिटचे दोष निर्माण होणार नाहीत याबाबत पुरवठा विभागाला सूचना देण्यात यावेत अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली. अद्यापही जिल्ह्यात काही ठिकाणी कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने पॉस मशिनवर धान्य वाटपात समस्या निर्माण होत असते. याबाबत तालुका पुरवठा कार्यालयाला मार्गदर्शन करावे अशी विनंतीही करण्यात आली आहे. याचबरोबर जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांसोबत विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.