पावस-पेजे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-पेजे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन
पावस-पेजे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन

पावस-पेजे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन

sakal_logo
By

-rat7p3.jpg ःP22L54871 पावस ः शिवारआंबेरे येथील शामराव पेजे विद्यालयात मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष नंदकुमार मोहिते.
---------------

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे
पेजे महाविद्यालयात उद्घाटन
पावस, ता. ८ ः शिवारआंबेरे येथील लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.‘माझी कला, माझा व्यवसाय, माझे करिअर’ या विषयावर प्रा. संदेश पालये यांनी मार्गदर्शन केले. ग्राफिक्स डिझायनिंग या संदर्भात विविध प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी दिशा देण्याचे काम केले. मुलांचे करिअर घडवण्याचे काम मंथन आर्ट स्कूल करत असल्याचे व क्रिएटिव्ह क्षेत्रातील शास्त्रशुद्ध तांत्रिक शिक्षण व करिअर संधी कोकणातील विद्यार्थ्यांना मिळावी, याचा प्रयत्न पालये यांनी करत असल्याचे सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी प्रा. प्रमोद वारीक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थापक अध्यक्ष नंदकुमार मोहिते, सचिव मधुकर थूळ, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राकेश आंबेकर, विजय मोहिते, बाळकृष्ण ठुकरूल, निळकंठ नाटेकर आदी उपस्थित होते.