राजापूर ः रेशीम उद्योगासाठी शासकीय स्तरावरून सहकार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः रेशीम उद्योगासाठी शासकीय स्तरावरून सहकार्य
राजापूर ः रेशीम उद्योगासाठी शासकीय स्तरावरून सहकार्य

राजापूर ः रेशीम उद्योगासाठी शासकीय स्तरावरून सहकार्य

sakal_logo
By

rat7p15.jpg ः KOP22L54903 राजापूर ः गटविकास अधिकारी सुहास पंडित यांच्याशी चर्चा करताना माजी सैनिक वासुदेव घाग, अमर खामकर, दयानंद चौगुले आणि शेतकरी.

रेशीम उद्योगासाठी शासकीय सहकार्य
बीडीओ सुहास पंडित ; लवकरच रेशीम निर्मितीला सुरवात
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ८ ः हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणामध्ये तुती लागवडीच्या माध्यमातून रेशीम उद्योगाची उभारणी करणाऱ्या राजापूर-लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांसह राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गटाचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुहास पंडित यांनी विशेष कौतुक केले. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या मागणीवर तुती लागवडीसह रेशीम उद्योगासाठी शासकीय स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्‍वासन दिल्याची माहिती राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गटाचे प्रमुख आणि माजी सैनिक वासुदेव घाग यांनी दिली.
राजापूर आणि लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गटाची स्थापना केली आहे. या गटातील शेतकऱ्यांनी तुती लागवड केली असून येत्या काही महिन्यांमध्ये प्रत्यक्ष रेशीम निर्मितीला सुरवात होणार आहे. तुती लागवड करणाऱ्यांनी राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गटाच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंडित यांची काल भेट घेतली.
कृषी अधिकारी परेश सुर्वे, कृषी विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे, राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गटाचे अध्यक्ष दयानंद चौगुले, माजी सैनिक घाग, अमर खामकर, राजाराम पाटेकर, हरिश्‍चंद्र पाटेकर, मनोहर पेडणेकर, सुधीर पालकर, हनुमंत विचारे आदी उपस्थित होते.

प्रशिक्षण देणार
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तुती लागवडीसह रेशीम उद्योगासंबंधित प्रशिक्षणाचे आयोजन करावे, शासकीय योजनेतून शेतकऱ्यांना लाभ वा अनुदानाद्वारे अर्थसाह्य मिळावे, अशी मागणी राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गटातर्फे गटविकास अधिकारी सुहास पंडित यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यांच्या मागणीची दखल घेऊन पंचायत समितीच्या पुढाकाराने आणि खादी ग्रामोद्योगाच्या सहकार्याने तुती लागवडीसह रेशीम उद्योगासंबंधित लवकरच शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्याचे पंडित यांनी सांगितले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तुती लागवडीसाठी रोजगार वा अनुदान उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी सांगितले.

.........ऑपरेटर/बातमीदार- बाईत....7-10-022.........