रत्नागिरी-संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-संक्षिप्त
रत्नागिरी-संक्षिप्त

रत्नागिरी-संक्षिप्त

sakal_logo
By

खंडाळा स्कूलमध्ये सरस्वती पूजन
रत्नागिरी ः तालुक्यातील खंडाळा इंग्लिश मीडियम स्कूल येथे सरस्वती पूजन व गरबा कार्यक्रम उत्साहात झाला. परशुराम जोग यांनी सरस्वतीपूजन केले. मुलांना प्रसाद वाटप करण्यात आले. मारुती आर्ट अकादमीतर्फे शाळेत चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे गरबा व दांडिया डान्स यामध्ये विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. मारूती शितप, पर्यवेक्षक शरद पावसकर उपस्थित होते.
----------

देसाई प्रशालेत म. गांधी, शास्त्री जयंती
रत्नागिरी ः मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. संतोष गार्डी, अंजली पिलणकर यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक प्रमोद शेखर यांनी लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्याविषयी माहिती दिली.