कोजागिरी पोर्णिमेनिमित्त बांद्यात आज कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोजागिरी पोर्णिमेनिमित्त 
बांद्यात आज कार्यक्रम
कोजागिरी पोर्णिमेनिमित्त बांद्यात आज कार्यक्रम

कोजागिरी पोर्णिमेनिमित्त बांद्यात आज कार्यक्रम

sakal_logo
By

कोजागरी पौर्णिमेनिमित्त
बांद्यात आज कार्यक्रम
बांदा, ता. ८ ः प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही येथील काणेकर कुटुंबीयांतर्फे कोजागरी पौर्णिमेनिमित्त उद्या (ता. ९) श्री साईबाबांचा उत्सव साजरा होणार आहे. यंदा या उत्सवाला ६९ वर्षे पूर्ण होत असून यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सकाळी दहाला श्री साईबाबांची महापूजा, दुपारी बाराला श्री साईबाबांची आरती, दुपारी एक ते तीन दरम्यान महाप्रसाद, सायंकाळी चारपासून तीर्थप्रसाद होणार आहे. रात्री नऊला पहिल्या सत्रात गोव्यातील नामवंत भजनी कलाकार पांडुरंग राऊळ, विठ्ठल शिरोडकर, प्रल्हाद गवस आणि त्यांचे सहकलाकारांचा पारंपरिक भजनाचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या सत्रात रात्री अकराला ज्येष्ठ संगीतकार, रचनाकार व गायक (स्व.) पं. जितेंद्र अभिषेकी बुवा यांचे शिष्य पं. हेमंत पेंडसे (पुणे) यांचा शास्त्रीय-उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना साथसंगत पं. तुळशीदास नावेलकर (गोवा) व राया कोरगावकर (गोवा) हे करणार आहेत. तिसऱ्या सत्रात डॉ. राम देशपांडे यांचे शिष्य नहुष लोटलीकर (गोवा) यांचा शास्त्रीय-उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना साथसंगत राया कोरगावकर (हार्मोनियम), बुद्धेश तळकर (तबला) करणार आहेत.