वन्यजीवांबाबत पाटमध्ये जागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वन्यजीवांबाबत पाटमध्ये जागृती
वन्यजीवांबाबत पाटमध्ये जागृती

वन्यजीवांबाबत पाटमध्ये जागृती

sakal_logo
By

55136
पाट ः वन्यजीव सप्ताहानिमित्त पाट हायस्कूलमध्ये झालेल्या स्पर्धा.

वन्यजीवांबाबत पाटमध्ये जागृती
कुडाळ ः मुलांमध्ये वन्यजीवांविषयी जागृती निर्माण व्हावी, म्हणून जिल्ह्यात वन विभागातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून पाट हायस्कूलमध्ये मुलांसाठी मार्गदर्शन वर्ग व चित्रकला स्पर्धा झाल्या. सहावी ते दहावीचे विद्यार्थी यात सहभागी झाले. विविध प्राण्यांची चित्रे मुलांनी रेखाटली. वनरक्षक रोहित माईनकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. सापांविषयीचे गैरसमज, खवले मांजराचे जीवनचक्र, प्राण्यांची जीवनप्रणाली याविषयी माहिती दिली. कलाशिक्षक संदीप साळसकर यांनी स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर व अन्य शिक्षक उपस्थित होते. दहावीच्या गटात ज्ञानेश्वर रावले, दत्तराज ठाकूर, पार्थ गोसावी यांनी, तर प्राथमिक विभागात मनीष चव्हाण, दिया सामंत, चैतन्य कोळंबकर यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले.
.............
आंबोलीत सांबराला जीवदान
आंबोली : कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या दोन वर्षांच्या सांबराला वन विभागाने सोडवून नैसर्गिक अधिवासात सोडले. वनरक्षक अमोल पटेकर, पी. डी. गाडेकर, बाळा गावडे, मंगेश नाटलेकर यांनी जखमी सांबरावर उपचार करून त्याला जंगलात सोडले.