एक्स्प्रेसला जादा थांबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक्स्प्रेसला जादा थांबा
एक्स्प्रेसला जादा थांबा

एक्स्प्रेसला जादा थांबा

sakal_logo
By

एक्स्प्रेसला जादा थांबा
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नागरकोईल जंक्शन गांधीधाम जंक्शन-नागरकोईल जंक्शन साप्ताहिक एक्स्प्रेसला आता आणखी एक थांबा वाढविला आहे. ही गाडी आता ध्रांगधरा रेल्वेस्थानकावरही थांबणार आहे. हा थांबा ११ पासून सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येत आहे. या गाडीला सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी स्थानकावर थांबा आहे. गांधीधाम-नागरकोईल शनिवारी सकाळी ७.५०, तर नागरकोईल-गांधीधाम बुधवारी दुपारी १२.१६ ला सावंतवाडी येथे पोहोचते.
---------------
वैभववाडीत सर्वाधिक पाऊस
सिंधुदुर्गनगरी : चोवीस तासांत वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १९.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ४.९ मिलीमीटर पाऊस झाला. तर एकूण सरासरी ३१९२.५ मिलीमीटर पाऊस झाला. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी अशी ः कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- ८.० (२५६६.५), मालवण- ३.३ (२८७१.८), सावंतवाडी- ०.७ (३५३७.६), वेंगुर्ले- १.० (२९३६.२), कणकवली- ६.५ (३४५९.७), कुडाळ- ०.९ (३३८२.८), वैभववाडी- १९.३ (३८४३.३), दोडामार्ग-४.८ (३५२५.७).
--
मळगावात आज नेत्र चिकित्सा
सावंतवाडी ः मळगाव इंग्लिश स्कूलमध्ये उद्या (ता. ९) मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आमिर खान यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
--
मालवणात मंगळवारी रक्तदान शिबिर
मालवण ः येथील धक्का मित्रमंडळातर्फे मंगळवारी (ता. ११) सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबाराला मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.