एकाग्रता यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकाग्रता यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली
एकाग्रता यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली

एकाग्रता यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली

sakal_logo
By

55141
तुळस : विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे उद्‍घाटन करताना माजी नगराध्यक्षा डॉ. पूजा कर्पे आदी.

एकाग्रता यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली

डॉ. पूजा कर्पे ः तुळस हायस्कूलमध्ये विद्यार्थी गुणगौरव

सावंतवाडी, ता. ८ ः श्री वेताळ विद्यामंदिर तुळस या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाच्या मदतीने राबविलेले विविध उपक्रम आदर्शवत आहेत. एकाग्रता ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पालकांनी आपल्या पाल्यांकडे काटेकोरपणे लक्ष देऊन सुसंस्कार केल्यास राष्ट्राच्या जडणघडणीत अप्रत्यक्षपणे आपला वाटा निश्चित राहील, असे प्रतिपादन वेंगुर्ले पालिकेच्या माजी नगराध्यक्षा डॉ. पूजा कर्पे यांनी केले.
पाटकर हायस्कूल वेंगुर्लेचे निवृत्त शिक्षक बाबुराव खवणेकर यांनी मराठी माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व विषद केले. आदर्श शाळा कशी असावी, याचे मूर्तिमंत उदाहरण श्री वेताळ विद्यामंदिर ही शाळा आहे, असे सांगून पालक व शिक्षकांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. आदर्श पुरस्कार प्राप्त वेताळ विद्यामंदिर तुळस येथे शाळेने राबविलेल्या कायम ठेव उपक्रमातून गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
वेंगुर्ले पंचायत समिती माजी सभापती यशवंत परब, बाबुराव खवणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‍घाटन झाले. अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव राऊळ होते. व्यासपीठावर तंटामुक्ती अध्यक्ष मंदार तुळसकर, पंच सदस्य जयवंत तुळसकर, बाबली कुडव, श्रद्धा नाईक, वसंत गावडे, गीता तांबोसकर, संपदा राऊळ आदी उपस्थित होते. श्री देव वेताळ मंदिरात श्रीफळ वाहून मान्यवरांचे स्वागत झाले. दोन वर्षांत विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष नंदकिशोर राऊळ यांचा सत्कार करण्यात आला. माजी सभापती परब यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपशिक्षक एकनाथ जानकर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका शीतल गावडे यांनी स्वागत केले. प्रा. सचिन परुळकर यांनी आभार मानले.