तळेरेत १२८ जणांची चिकित्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेरेत १२८ जणांची चिकित्सा
तळेरेत १२८ जणांची चिकित्सा

तळेरेत १२८ जणांची चिकित्सा

sakal_logo
By

55145
तळेरे ः शिबिरात तपासणी करताना डॉक्टरांची टीम. (छायाचित्र : एन. पावसकर)

तळेरेत १२८ जणांची चिकित्सा
तळेरे : येथील आदर्श व्यापारी संघटनेतर्फे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरात ११६ जणांची रक्त व रक्तदाब तपासणी तसेच १२ जणांची ईसीजी तपासणी करण्यात आली. डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. प्रकाश बावधनकर, प्रा. आरोग्य केंद्राच्या डॉ. प्रणोती इंगवले, माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, अशोक तळेकर, उदय तळेकर, व्यापारी संघटना अध्यक्ष राजू जठार, उपाध्यक्ष बाबू कल्याणकर, राजू पिसे, प्रवीण वरुणकर, सचिन पिसे, सेक्रेटरी आप्पा कल्याणकर, तळेरे उपकेंद्राच्या डॉ. धनश्री जाधव, महालॅबच्या साक्षी महाडिक आदींच्या उपस्थितीत उद्‍घाटन झाले. या शिबिरास सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य यंत्रणा व महालॅब यांचे विशेष सहकार्य मिळाले. यावेळी व्यावसायिक हनुमंत तळेकर, संतोष कल्याणकर, कुमार कल्याणकर, प्रवीण वरुणकर, अमोल सोरप, प्रमोद खटावकर, माई तळेकर, रंजन खटावकर आदी उपस्थित होते.
............
55146
कोल्हापूर ः विक्रम कासार यांना गौरविताना मान्यवर.

कासार, वारंग यांचे यश
सावंतवाडी ः कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय युवक महोत्सवात माजगाव येथील कुणाल वारंग याने सुगम गायन तसेच हार्मोनियम एकल वादनात प्रथम क्रमांक पटकावला. तर माजगाव-कासारवाड येथील विक्रम कासार याने तबला सोलो वादनात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या दोघांची नाशिक येथे होणाऱ्या राजस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, विद्यार्थी कल्याण व बहिःशाल शिक्षण सेवा केंद्र विभागीय केंद्र, कोल्हापूरच्या संयुक्त विद्यमाने विभागीय युवक महोत्सव २०२२ चे आयोजन कोल्हापूर येथे केले होते.
--
५४८८५
नडगिवे ः सरस्वती पूजन करताना मुख्याध्यापक निकम व शिक्षक.

नडगिवे स्कूलमध्ये शारदोत्सव
तळेरे : आदर्श एज्युकेशन सोसायटी खारेपाटण संचालित नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सरस्वती पूजन उत्साहात झाले. यानिमित्त विद्यालयात समूहगीत, वक्तृत्व आणि गरबा नृत्य इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मुख्याध्यापक एस. वाय. निकम यांच्या हस्ते देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सरस्वतीचे पूजन केले. विद्यार्थिनींनी सरस्वती स्तवन सादर केले. श्रुती कावळे हिने सरस्वती पूजनासंदर्भात माहिती दिली. मुख्याध्यापक निकम यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी गरबा नृत्य सादर केले. सहशिक्षक ओंकार गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.