सावंतवाडी शहरासाठी निधी द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी शहरासाठी निधी द्या
सावंतवाडी शहरासाठी निधी द्या

सावंतवाडी शहरासाठी निधी द्या

sakal_logo
By

55174
संजू परब

सावंतवाडी शहरासाठी निधी द्या

संजू परब ः पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन

सावंतवाडी, ता. ८ ः शहरातील विकासकामांबाबत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत निवेदन दिले. शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, अग्निशमन केंद्र व रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधींच्या निधीची आवश्यकता असून ती पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सावंतवाडी शहर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असून मध्यवर्ती शहर आहे. सावंतवाडी नगरपरिषद ‘क’ वर्ग नगरपरिषद असून नगरपरिषदेचा स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता दिली आहे. प्रकल्प अहवालात नमूद उपकरणे, मशीन यंत्रे इत्यादीची खरेदी करून नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या अंमलबजावणीची कार्यवाही सुरु आहे. सावंतवाडी पालिका ‘क’ वर्ग असून पालिका क्षेत्रात अंदाजे प्रतिदिन ७ ते ८ टन ओला कचरा व ५ टन सुका कचरा निर्माण होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कारीवडे येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला असून या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. सुक्या कचऱ्याचे किमान ३५ प्रकारात वर्गीकरण करण्यात येते. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट व गांडूळ खत निर्मिती करण्यात येते. या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया (एफएसटीपी) प्रकल्प उभारलेला आहे; परंतु हा प्रकल्प अपुरा पडणार आहे. तसेच पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये राज्यस्तरावर सातवा क्रमांक प्राप्त केलेला असून याहीपेक्षा प्रगतीने काम करून त्यामध्ये सातत्य राखण्यासाठी विविध कामांसाठी निधीची आवश्यकता आहे. सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी ५० केएलडी क्षमतेचा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी ५० लाख, निंबाळकर पीर येथे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी २५ केएलडीक्षमतेचा एसटीपी प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी १५ लाख, दर दिवशी ५ टन क्षमता सी ॲन्ड डी बेस्टवर प्रक्रिया करण्यासाठी पुनर्वापर केंद्र उभारण्यास ३५ लाख व सुक्या कचऱ्यापासून ब्रिकेट तयार करण्यासाठी डस्टर मशिन खरेदीसाठी ९ लाख अशी घनकचरा व्यवस्थापनाकरिता निधीची आवश्यकता असून, सावंतवाडी पालिकेक १ कोटी ९ लाख निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी परब यांनी केली.
--
पर्यटनदृष्ट्या महत्त्व
सावंतवाडी पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची असून शहरात दररोज अनेक पर्यटक येतात. तालुक्याचे ते मध्यवर्ती ठिकाण आहे. पालिकेने आरक्षण क्र. ४७ या जागेत अग्निशमन केंद्र बांधण्याचे नियोजित केले आहे; परंतु शासन निधी नसल्याने अद्यापर्यंत बांधकाम झालेले नाही. आपल्या स्तरावर (जिल्हास्तर) जिल्हा नगरोत्थान अग्निसुरक्षा अभियानांतर्गत (२०२२-२३) अग्निशमन केंद्र बांधणे व शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ६३० लाख रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.