‘गोव्यातील रुग्णालयात जिल्ह्याला प्राधान्य द्या’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोव्यातील रुग्णालयात 
जिल्ह्याला प्राधान्य द्या’
‘गोव्यातील रुग्णालयात जिल्ह्याला प्राधान्य द्या’

‘गोव्यातील रुग्णालयात जिल्ह्याला प्राधान्य द्या’

sakal_logo
By

55181
घारपी ः केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना निवेदन देताना सरपंच अक्रम खान. सोबत विजय गावकर, ज्ञानेश्वर सावंत आदी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

‘गोव्यातील रुग्णालयात
जिल्ह्याला प्राधान्य द्या’

बांदा सरपंचांचे मंत्री नाईकांना निवेदन

बांदा, ता. ८ ः गोव्यात धारगळ येथे आयुष मंत्रालयातर्फे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर, परिचारिकांना सेवेत प्राधान्याने सामावून घ्यावे, अशी मागणी बांदा सरपंच अक्रम खान यांनी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे. घारपी येथे खासगी दौऱ्यावर आलेल्या मंत्री नाईक यांना तसे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वैद्यकीय व परिचारिकेचे शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी दरवर्षी बाहेर पडतात. राज्यात गेली दहा वर्षे सातत्याने दहावी व बारावी बोर्डात कोकण अव्वल आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही जिल्ह्यात वैद्यकशास्त्रात नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याने ते वैद्यकीय सेवा देण्यापासून वंचित राहत आहेत. सिंधुदुर्ग व गोव्याचे ऋणानुबंध कायम आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना प्राधान्याने रुग्णालयाच्या सेवेत सामावून घ्यावे.
यावेळी श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख विजय गावकर, ज्ञानेश्वर सावंत, शैलेश लाड, रत्नाकर आगलावे, शरद सावंत, राजू खान, आपा आगलावे, मनोज सावंत, गुणेश गवस, शिवा गावकर, सिद्धेश परब, संतोष तारी, प्रसाद यादव आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री नाईक यांनी गोवा व सिंधुदुर्गाचे संबंध हे दृढत्वाचे आहेत. आतापर्यंत दोन्ही प्रांतांनी नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. त्यामुळे या मागणीचा निश्चितच विचार करण्यात येईल, असे सांगितले.