मालवण जेटीवर रंगला गरबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवण जेटीवर रंगला गरबा
मालवण जेटीवर रंगला गरबा

मालवण जेटीवर रंगला गरबा

sakal_logo
By

55189
मालवण ः मनसे, मनविसेतर्फे आयोजित गरबा नृत्य स्पर्धांना लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
----------------------------------------------

मालवण जेटीवर रंगला गरबा
---
मनसेचा पुढाकार; विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव
मालवण, ता. ८ : दसरोत्सवानिमित्त येथील बंदर जेटी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित भव्य गरबाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. ५ ऑक्टोबरला ही स्पर्धा पार पडली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक कुबल, शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर, उपतालुकाध्यक्ष प्रशांत पराडकर, राजा गावडे, मनविसे जिल्हाध्यक्ष नीलेश मेस्त्री, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, सत्यवान गावडे, भारती वाघ, दीपक गुराम, गुरू तोडणकर आदी उपस्थित होते.
या वेळी उपजिल्हाध्यक्ष कुबल, मनविसे उपतालुकाध्यक्ष जनार्दन आजगावकर, सर्जेकोट शाखाध्यक्ष वैभव आजगावकर, मनविसे युवती तालुकाध्यक्ष प्राजक्ता पार्टे, मनसे उपतालुकाध्यक्ष संकेत वाईरकर, तारकर्ली विभाग अध्यक्ष बजरंग कुबल, शाखाध्यक्ष प्रसाद बापर्डेकर, शाखाध्यक्ष मनमोहन केळुसकर, कोळंब शाखाध्यक्ष गणेश कांदळगावकर, मनविसे शहराध्यक्ष वैभव माणगावकर, उपशहराध्यक्ष लौकिक अंधारी, माजी मनविसे तालुकाध्यक्ष विनायक गावडे, विशाल निकम, दर्शन सावजी, ऋषभ आजगावकर, रजत दळवी, आशिष घाडीगावकर, प्रथम देऊलकर, वैभव तळवडकर, तुषार जुवेकर, अविनाश आचरेकर, जितू वाघ, सिद्धेश परब, चिन्मय पराडकर, सुदेश जामसंडेकर, विनायक परब, देवीदास परब, अनुज आडकर, कौस्तुभ खडपकर, नानू करवडकर उपस्थित होते. सायली मांजरेकर, नेत्रा दळवी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. अक्षय सातार्डेकर, प्रथमेश सामंत यांनी सूत्रसंचालन केले.
--
विविध स्पर्धांचा अनुक्रमे निकाल
वेशभूषा- आनंद धुरी (आनंद दिघे), दीपक धुरी (कलश नृत्यांगणा), यज्ञा (ब्रह्मराक्षस), उत्तेजनार्थ- नितीन तोडणकर (वाघ), विशेष पारितोषिक- रॅचेल लुगेरा (कालिमाता), उत्कृष्ट गरबा नृत्य- कोमल चव्हाण, तृप्ती गावडे, ऋतुजा शेलटकर, उत्कृष्ट जोडी- सानिका रावले, साक्षी नेवाळे, उत्कृष्ट ज्येष्ठ- कांचन ओटवणेकर, बालगट उत्कृष्ट- ग्रीष्मा वेर्लेकर.