रत्नागिरी ः एचडी, बुलेट, एएनपीआर कॅमेऱा प्रकल्पाला मिळाल मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः एचडी, बुलेट, एएनपीआर कॅमेऱा प्रकल्पाला मिळाल मुहूर्त
रत्नागिरी ः एचडी, बुलेट, एएनपीआर कॅमेऱा प्रकल्पाला मिळाल मुहूर्त

रत्नागिरी ः एचडी, बुलेट, एएनपीआर कॅमेऱा प्रकल्पाला मिळाल मुहूर्त

sakal_logo
By

रत्नागिरीत सीसीटीव्ही बसवण्यास मुहूर्त
बुधवारपासून कामाला प्रारंभ; अत्याधुनिक कॅमेऱ्यांमुळे बारीकसारीक घडामोडींवर राहणार नजर
राजेश शेळके ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः एचडी, बुलेट आणि एएनपीआर अशा अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे रत्नागिरी शहरामध्ये निर्माण करण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे. मुंबईमधील एका कंपनीने ठेका घेतला असून बुधवार (ता. १२) पासून शहरामध्ये ५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात होणार आहे. १ कोटीचा प्रकल्प असून त्यासाठी लागणारे खांब आले आहेत. गुन्हेगारी, गैरप्रकार, बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतुकीला होणारा अडथळा आदी बारीकसारीक हालचालींवर पोलिसांची नजर राहणार आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या प्रयत्नातून हा १ कोटीचा प्रकल्प होत आहे. यामध्ये शहरांतील सर्व प्रवेशद्वारांपासून सावर्जनिक ठिकाणे, महत्त्‍वाची ठिकाणे, किनारे, बंदर, जेटी, एसटी बस स्थानक, काही संवेदनशील भाग आदी ठिकाणी सुमारे ५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी कोकण परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते प्रकल्पाचा आरंभ केला. त्यासाठी ई-निविदा प्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील कंपनीने त्याचा ठेका घेतला आहे; मात्र अजून त्या कामाला सुरुवात झाली नव्हती.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बुधवारी (ता. १२) पासून रत्नागिरी शहरात अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये खून, लूटमार, चोऱ्या यासारखे गंभीर प्रकार घडत आहे. यामध्ये पोलिसांना गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी जास्तीत जास्त सीसीटीव्ही फूटेजचा फायदा झाला आहे. फूटेजमुळे चोरटे, खुनातील गुन्हेगारांपर्यंत पोलिसांना पोहचण्यात मदत होऊन हे गुन्हे उघड झाले आहेत. हे अत्याधुनिक कॅमेरे लागल्यानंतर त्याचा आणखी फायदा होणार आहे.


..अशी आहेत कॅमेऱ्यांची वैशिष्ट्ये
शहरात बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिवसा आणि रात्रीही चांगल्या पद्धतीचे रेकॉर्डिंग होईल, असे एचडी दर्जाचे, वेगवान वाहनाचे नंबर टिपणारे बुलेट कॅमेरे आणि मुव्हेबल (इकडे तिकडे फिरणारे) एएनपीआर दर्जाचे कॅमेरे आहेत. शहरात या कॅमेऱ्यांचे जाळे फिरल्यानंतर गुन्हेगारी, गैरप्रकार आणि बेशिस्त पार्किंगला चाप बसण्यास मदत होणार आहे. वाहतूक कोंडी होईल अशी वाहने लागल्यास बीप देणाऱ्या कॅमेऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे.