रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावरचे ब्लॅक स्पॉट शोधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावरचे ब्लॅक स्पॉट शोधा
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावरचे ब्लॅक स्पॉट शोधा

रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावरचे ब्लॅक स्पॉट शोधा

sakal_logo
By

मुंबई-गोवा महामार्गावरचे ब्लॅकस्पॉट शोधा
बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण : नाशिक अपघातानंतर सूचना
रत्नागिरी, ता. ८ ः मुंबई-गोवा महामार्गावरही ब्लॅकस्पॉट शोधण्यासाठी समितीला सूचना दिल्या आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर महामार्गांवरील दुरुस्त्या केल्या जातील, असे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले तर धनुष्यबाण चिन्ह हे शंभर टक्के एकनाथ शिंदे यांच्या ओरिजिनल शिवसेनेलाच मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.
रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या मंत्री चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजू न्यायालयात मांडली आहे.’’
नाशिकमधील अपघाताविषयी मंत्री चव्हाण म्हणाले, ‘‘खासगी बसला झालेला अपघात ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ज्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपये मदत घोषित केली आहे. अपघात टाळण्यासाठी महामार्गांवरील सगळे ब्लॅकस्पॉट शोधून काढण्यास सांगितले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरही असलेल्या ब्लॅकस्पॉटबाबत सूचना दिल्या आहेत. त्यासाठी स्वतंत्र समिती कार्यरत आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम, पोलिस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी असतात. त्यांनी शोधलेले ब्लॅकस्पॉट काढून टाकण्यासाठी येणारा खर्च याबाबतही विचार करावा लागेल. त्या ब्लॅकस्पॉटसाठीची तीव्रता तपासून त्यातील दुरुस्तीला प्राधान्य दिले जाईल. यासाठी समितीचा अहवाल येणे अपेक्षित असून तो आल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गासह संपूर्ण महाराष्ट्रात उपाययोजना करण्यात येतील.’’

पार्लमेंट टू पंचायत शतप्रतिशत भाजप
कोकणात ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत. ही निवडणूक पक्षाच्या छोट्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची असते. त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधून पार्लमेंट टू पंचायत शतप्रतिशत भाजप अशी भूमिका पोचवण्याचे काम केले जात आहे. सशक्त भारतासाठी भाजप सशक्त करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत भाजपचे विचार तळात पोचेल तरच पारदर्शकता होईल. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत भाजपच्या विचाराची माणसे जाणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने ग्रामंपचायत निवडणुकीला महत्त्‍व देऊन कामे सुरू आहेत, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.