रत्नागिरी ः पुरकाळात ''रत्नदुर्गने...'' केलेले काम कौतुकास्पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः पुरकाळात ''रत्नदुर्गने...'' केलेले काम कौतुकास्पद
रत्नागिरी ः पुरकाळात ''रत्नदुर्गने...'' केलेले काम कौतुकास्पद

रत्नागिरी ः पुरकाळात ''रत्नदुर्गने...'' केलेले काम कौतुकास्पद

sakal_logo
By

२ कॉलम घेणे..
-rat8p16.jpg- KOP22L55188
रत्नागिरी ः रत्नदुर्ग माउंटेनिअर्स संस्थेच्या छ. शिवाजी क्रीडांगण येथे नूतन कार्यालयाचे फित कापून उद्घाटन करताना मंत्री उदय सामंत.


पूरकाळात ''रत्नदुर्गने’चे काम कौतुकास्पद
उदय सामंत; रत्नदुर्ग माउंटेनिअर्सच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन
रत्नागिरी, ता. ८ ः चिपळूणमधील महापुराच्यावेळी रत्नदुर्गने केलेल्या साहसी बचावकार्य थरकाप उडवणारे होते. त्यांच्या या धाडसी कार्याचे मनापासून कौतुक करतो. आपद्ग्रस्त ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवताना वाहनाची अडचण येते. रत्नदुर्ग माउंटेनिअर्सच्या दलात लवकरच रेस्क्यू सामानाची वाहतूक करण्यासाठी वाहन उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रत्नदुर्ग माउंटेनिअर्स संस्थेच्या शिवाजी स्टेडियम येथे सुरू करण्यात आलेल्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, राजन शेटे, दत्तात्रय साळवी, निमेश नायर, बिपिन बंदकर, संतोष तावडे, पेडणेकर आदी उपस्थित होते. माउंटेनिअर्सचे अध्यक्ष वीरेंद्र वणजू यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केल्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमासाठी रत्नदुर्गचे 1994 पासूनचे सदस्य उपस्थित होते.