कापूर कंपनी मालकाने मागितली जाहीर माफी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कापूर कंपनी मालकाने
मागितली जाहीर माफी
कापूर कंपनी मालकाने मागितली जाहीर माफी

कापूर कंपनी मालकाने मागितली जाहीर माफी

sakal_logo
By

कापूर कंपनी मालकाने
मागितली जाहीर माफी

बांद्यातील आंदोलनाला अखेर यश

बांदा, ता. ८ ः प्रभू श्री रामचंद्रांचा जाहिरातीत अवमान झाल्याप्रकरणी ‘त्या’ कापूर कंपनीच्या मालकाने अखेर भाविकांची जाहीर माफी मागितली. आमदार नीतेश राणेंच्या दणक्यानंतर त्याने नरमाईची भूमिका घेतली. तसा माफीनाम्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित केला आहे. बांद्यातील व्यापारी व नागरिकांनी संबंधित कंपनीची तक्रार आमदार राणेंकडे केली होती. तसेच संबंधित कंपनीचा कापूर विक्री व वापर बंद केला होता.
आमदार राणे यांनी बांदावासीयांच्या या ‘त्याग’ आंदोलनाची दखल घेत कंपनीला माफी मागण्यास भाग पाडण्याचे अभिवचन आठ दिवसांपूर्वी येथे दिले होते. कापूर बनविणाऱ्या संबंधित कंपनीने दीड वर्षांपूर्वी कापूरची जाहिरात टेलिव्हिजनवर प्रकाशित केली होती. त्यात प्रभू श्रीरामचंद्रांचा अवमान झाल्याचे बांदावासीयांचे म्हणणे होते. त्यावरून भाविकांमध्ये नाराजी होती. बांदा शहरातील सर्व देवस्थाने, व्यापारी व नागरिकांनी कापूर त्याग आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व व्यापारी आशुतोष भांगले यांनी केले होते. सरपंच अक्रम खान यांनी आंदोलनाची माहिती आमदार राणे यांना दिली. त्यांनी संबंधित कंपनीच्या मालकाला माफी मागण्यास भाग पाडू, लवकरच तसे चित्र दिसेल, असा ठोस शब्द दिला होता. कंपनीच्या मालकांनी तसा माफीचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात त्यांनी समस्त भाविकांची जाहीर माफी मागितली आहे. भक्तांच्या भावना दुखावण्याचा आमच्या कंपनीचा हेतू नव्हता. जाहिरात हटविण्यात आली असून समस्त भक्तगणांची माफी मागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत बांद्यातील व्यापारी, आंदोलक व नागरिकांनी आमदार राणेंचे आभार मानले.