सावंतवाडीत आज महाआरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत आज 
महाआरोग्य शिबिर
सावंतवाडीत आज महाआरोग्य शिबिर

सावंतवाडीत आज महाआरोग्य शिबिर

sakal_logo
By

सावंतवाडीत आज
महाआरोग्य शिबिर
सावंतवाडी,ता.८ ः सावंतवाडी संस्थान आणि अटल प्रतिष्ठानच्यावतीने उद्या (ता. ९) सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत येथील राजवाड्यात महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. सांगली येथील उष:काल इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने हा उपक्रम होणार असून मोफत तपासणी केली जाणार आहे. शिबिराचे उद्‍घाटन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे. शिबिरात हृदयरोग, अस्थिरोग, स्त्रीरोगांची तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार असून मोफत औषधोपचार दिले जाणार आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा मिळण्यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे. एखादी मोठी शस्त्रक्रिया करायची असल्यास ती सुविधा सांगली येथील रुग्णालयात उपलब्ध करून दिली जाणार आहे. रुग्णालयाची गाडी या ठिकाणी येऊन रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाणार आहे. जनरल फिजिशियन, जनरल सर्जन, पेन मॅनेजमेंट, निशुल्क ईसीजी आणि टुडी-इको आदी तपासण्या केल्या जाणार आहेत.